Maka Market : खरीप हंगाम २०२५-२६ साठी मका पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP) २४०० रुपये प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. तर सध्या कमीत कमी १ हजार रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतो आहे. यातही वाणानुसार भाव मिळत असल्याचे चित्र आहे. हायब्रीड, लाल, पिवळ्या, लोकल मक्याचा समावेश आहे.
आता मागील तीन वर्षातील मका बाजारभावाचा विचार केला तर नोव्हेंबर २०२२ मध्ये १८७६ रुपये प्रति क्विंटल, नोव्हेंबर २०२३ मध्ये २००० रुपये प्रति क्विंटल, नोव्हेंबर २०२४ मध्ये १९३१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. यंदाच्या नोव्हेंबर २०२५ महिन्यासाठी मक्याचे किंमत अंदाज १७१० रुपये ते २००५ रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे.
केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या तिसऱ्या अग्रीम अप्रधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण मक्याचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत ११.०२ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. देशात चालू वर्षीच्या सप्टेंबर २०२५ मध्ये मक्याची आवक मागील वर्षीच्या सप्टेंबर २०२४ च्या तुलेनत ३३.१५ टक्क्यांनी वाढली आहे.
