Maka Bajarbhav : मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवकमध्ये (Maka Market) राष्ट्रीय पातळीवर १२.१९ टक्के इतकी वाढ झाली आहे. तर राज्य पातळीवर ०.५७ टक्के इतकी घट झाली आहे. तर मागील आठवड्यात नांदगाव बाजारात मक्याची किंमत २०५० रुपये प्रतिक्विंटल होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात देखील किंमत समान आहे.
खरीप हंगाम (Kharif Season) २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत २२२५ रुपये प्रतिक्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती MSP पेक्षा कमी आहेत. मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी अमळनेर बाजारात मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक २१८५ रुपये प्रतिक्विंटल होती, तर जालना बाजारात सर्वात कमी किंमत १९९२ रुपये प्रतिक्विंटल होती.
काही निवडक बाजार समित्यांमधील मागील आठवड्यात मक्याचे बाजारभाव पाहिले असता नांदगाव बाजारात प्रतिक्विंटल २०५० रुपये, अमळनेर बाजारात २१८५ रुपये, धुळे बाजारात २०३५ रुपये, छत्रपती संभाजी नगर बाजारात २००२ रुपये, तर जालना बाजारात १९९२ रुपये दर मिळाला.
आजचे बाजारभाव
आजचे मका बाजारभाव पाहिले असता छत्रपती संभाजीनगर बाजारात पिवळ्या मक्याला कमीत कमी २१२८ रुपये, भोकरदन बाजारात २१५० रुपये, देऊळगाव राजा बाजारात २३०० रुपये, तर कर्जत बाजारात २२०० रुपये दर मिळाला. तसेच लाल मक्याला जालना बाजारात २०५० रुपये, अमरावती बाजारात २२०० तर पुणे बाजारात २५०० रुपये दर मिळाला.