Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > मक्याचे दर एमएसपीच्या खाली, तिकडून जीएम मक्याची मुक्त आयात, उत्पादनाला आडकाठी का?

मक्याचे दर एमएसपीच्या खाली, तिकडून जीएम मक्याची मुक्त आयात, उत्पादनाला आडकाठी का?

Latest News Maize prices are below MSP, so why is there free import of GM maize from there, hindering production? | मक्याचे दर एमएसपीच्या खाली, तिकडून जीएम मक्याची मुक्त आयात, उत्पादनाला आडकाठी का?

मक्याचे दर एमएसपीच्या खाली, तिकडून जीएम मक्याची मुक्त आयात, उत्पादनाला आडकाठी का?

Maka Market : केंद्र सरकारने जीएम पिकांच्या उत्पादनावर बंदी घातली असली तरी आयातीला मात्र परवानगी दिली आहे. 

Maka Market : केंद्र सरकारने जीएम पिकांच्या उत्पादनावर बंदी घातली असली तरी आयातीला मात्र परवानगी दिली आहे. 

- सुनील चरपे
नागपूर : भारत-अमेरिका व्यापारी करारामुळे भारतात जीएम मक्याची आयात वाढणार असून, त्यावरील १५ ते ५० टक्के आयात शुल्क रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारने जीएम पिकांच्या उत्पादनावर बंदी घातली असली तरी आयातीला मात्र परवानगी दिली आहे. 

अमेरिकेच्या जीएम मक्याची उत्पादकता भारतातील नाॅन जीएम हायब्रिड मक्याच्या तुलनेत तिप्पट आहे. देशांतर्गत बाजारात मक्याचे दर एमएसपीच्या खाली असताना सरकार हा मका एमएसपी दराने खरेदी करण्यास तयार नाही.

अमेरिकेचे मका पेरणीक्षेत्र सुमारे ४०० लाख हेक्टर असून, त्यांच्या जीएम मक्याची उत्पादकता प्रतिहेक्टर १०५ ते ११५ क्विंटल आणि उत्पादनखर्च प्रतिहेक्टर १.३० ते १.६० लाख रुपये म्हणजेच १,३०० ते १,५०० रुपये प्रतिक्विंटल आहे. भारतात मक्याचे पेरणीक्षेत्र ९५ ते १०५ लाख हेक्टर आहे; तर उत्पादकता प्रतिहेक्टर ३५ ते ४५ क्विंटल आणि खर्च ७० ते ९० हजार रुपये प्रतिहेक्टर म्हणजेच १,९०० ते २,१०० रुपये प्रतिक्विंटल आहे.

मक्याच्या अतिरिक्त उत्पादनामुळे अमेरिकेला हक्काची बाजारपेठ हवी आहे. भारत मात्र जीएम पिकांच्या उत्पादनाला परवानगी देऊन तसेच मक्याची प्रतिहेक्टर उत्पादकता व उत्पादन वाढवून आत्मनिर्भर हाेण्याऐवजी मक्याच्या आयातीला प्राधान्य देत आहे. कमी दराचा अमेरिकन मका आयात केल्याने भारतातील मक्याचे दर दबावात येऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हाेणार आहे.

पीक विविधता व अन्नसुरक्षेला धाेका
भारतात मक्याचे उत्पादन ३७५ ते ३८० लाख टन आहे. यातील ६० टक्के मका पशुखाद्य, १५ ते २० टक्के स्टार्च आणि २४ ते २७ टक्के इथेनाॅल निर्मितीसाठी वापरला जाताे. एक टन मक्यापासून ३८० ते ४०० लिटर इथेनाॅल तयार हाेत असल्याने जगात मक्याला प्राधान्य दिले जात आहे.

केंद्र सरकारच्या इथेनाॅल धाेरणामुळे मागील १२ वर्षांत देशातील मक्याच्या पेरणीक्षेत्रात ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ देशातील पीकविविधता व अन्नसुरक्षेसाठी धाेकादायक ठरण्याची शक्यता २०२६ च्या आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त केली आहे.

खरेदी करण्यास सरकार उदासीन
केंद्र सरकारने सन २०२५-२६ च्या हंगामासाठी मक्याची एमएसपी प्रतिक्विंटल २,४०० रुपये जाहीर केली असून, या दराने देशभरात १० लाख टन मका खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले हाेते. सरकारने नाफेड व एनसीसीएमच्या माध्यमातून तीन महिन्यांत ४.५० लाख टन मका खरेदी केला आहे. इथेनाॅल उत्पादक कंपन्यांना कमी दरात मका उपलब्ध व्हावा, यासाठी सरकार एमएसपी दराने मका खरेदी करीत नाही, असा आराेप शेतमाल बाजारतज्ज्ञांनी केला आहे.

Web Title : गिरते मक्का के दाम, जीएम आयात से भारतीय किसान खतरे में

Web Summary : अमेरिका से सस्ते जीएम मक्का आयात से कम कीमतों से जूझ रहे भारतीय किसानों को खतरा है। एमएसपी खरीद में सरकार की उदासीनता स्थिति को और खराब करती है। इथेनॉल नीति मक्का क्षेत्र को बढ़ावा देती है, जिससे फसल विविधता और खाद्य सुरक्षा को खतरा है।

Web Title : Falling corn prices, GM import threaten Indian farmers: Report

Web Summary : Cheap GM corn imports from America threaten Indian farmers already struggling with low prices. Government apathy in MSP purchases worsens the situation. Ethanol policy boosts corn area, risking crop diversity and food security.