Maka Market : सद्यस्थितीत मक्याचे दर अतिशय कमी असून मागील तीन वर्षांचा आढावा घेतला असता सरासरी २ हजार रुपये दर मिळाला. मात्र यंदाची परिस्थिती त्याहून बिकट असल्याचे चित्र आहे. यंदाच्या डिसेंबरमध्ये काय दर मिळतोय, ते पाहुयात....
केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या अंतिम अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण मक्याचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत ८२.७३ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.
मागील तीन वर्षातील नांदगाव बाजारातील मक्याच्या डिसेंबर महिन्यातील सरासरी किंमती पुढील प्रमाणे.
- डिसेंबर २०२२ रुपये २०१४ प्रति क्विंटल
- डिसेंबर २०२३ -रुपये २०८७ प्रति क्विंटल
- डिसेंबर २०२४ रुपये २०८० प्रति क्विंटल
डिसेंबर २०२५ महिन्यासाठी मक्याचे नांदगाव बाजारातील किंमत अंदाज पुढील प्रमाणे : १६१० ते १९१५ रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२४-२५ मध्ये, भारतात मागील वर्षाच्या तुलनेत १२.२४ टक्के मक्याचे उत्पादनात वाढ होण्याच्या अंदाज आहे. तसेच सन २०२४-२५ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये मक्याचे उत्पादनात १७ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.
देशात चालू वर्षीच्या ऑक्टोबर २०२५ मध्ये मक्याची आवक मागील वर्षीच्या ऑक्टोबर २०२४ च्या तुलेगत ४१.४ टक्क्यांनी वाढली आहे. तर खरीप हंगाम २०२५-२६ साठी मका पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP) २५०० प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे.
- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी मका पिकाच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.
