Lokmat Agro >बाजारहाट > Limbu Bajar Bhav : लिंबू दरात माेठी घसरण; जाणून घ्या कसा मिळतोय भाव

Limbu Bajar Bhav : लिंबू दरात माेठी घसरण; जाणून घ्या कसा मिळतोय भाव

latest news Limbu Bajar Bhav: Lemon prices have fallen sharply; know how to get the price | Limbu Bajar Bhav : लिंबू दरात माेठी घसरण; जाणून घ्या कसा मिळतोय भाव

Limbu Bajar Bhav : लिंबू दरात माेठी घसरण; जाणून घ्या कसा मिळतोय भाव

Limbu Bajar Bhav : लिंबू उत्पादक शेतकरी भावाच्या मोठ्या घसरणीमुळे संकटात आले आहेत. गतवर्षी १००–११० रुपये किलोने विकला जाणारा लिंबू यंदा फक्त ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. खर्च वाढूनही भाव मिळत नसल्याने कोल्ड स्टोरेज आणि प्रक्रिया उद्योगाची मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत आहे. (Limbu Bajar Bhav)

Limbu Bajar Bhav : लिंबू उत्पादक शेतकरी भावाच्या मोठ्या घसरणीमुळे संकटात आले आहेत. गतवर्षी १००–११० रुपये किलोने विकला जाणारा लिंबू यंदा फक्त ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. खर्च वाढूनही भाव मिळत नसल्याने कोल्ड स्टोरेज आणि प्रक्रिया उद्योगाची मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत आहे. (Limbu Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Limbu Bajar Bhav : पारंपरिक पिकांऐवजी लिंबू शेतीकडे वळलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी यंदा मोठ्या अडचणीत आले आहेत. गतवर्षी सप्टेंबरमध्ये १०० ते ११० रुपये किलो दराने विकला जाणारा लिंबू सध्या केवळ ४० रुपये किलो भावाने विक्री होत आहे. उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. (Limbu Bajar Bhav)

जिल्ह्यातील लागवड आणि उत्पादन

धाराशिव जिल्ह्यात एकूण ५४० हेक्टरवर लिंबाची लागवड झाली आहे.

तुळजापूर, भूम, परंडा, कळंब या तालुक्यांत सर्वाधिक क्षेत्र लिंबाखाली आहे.

सध्या या भागातून दररोज ३ ते ५ टन लिंबू परजिल्हा व परराज्यात पाठवला जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव येथे दररोज एक टनापेक्षा जास्त आवक नोंदवली जाते.

भावातील घसरण

गतवर्षी (सप्टेंबर २०२४) आडत बाजारात लिंबूचे दर ४ हजार ते ८ हजार प्रति क्विंटल होते.
यंदा (सप्टेंबर २०२५) आवक वाढल्याने दर घसरून फक्त १ हजार ३०० ते २ हजार ५०० प्रति क्विंटल झाले आहेत.

दर कमी झाल्यामुळे उत्पादनाचा खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

हवामानाचा व रोगांचा परिणाम

यंदा मे महिन्यापासूनच पावसाळा सुरू झाला आणि अनेक दिवस ढगाळ हवामान राहिले.

या वातावरणामुळे लिंबू बागांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढला.

फवारणी, खत व्यवस्थापन आणि मजुरीवर खर्च मोठ्या प्रमाणात वाढला.

गतवर्षाच्या तुलनेत मजुरी दुप्पटीने, तर उत्पादन खर्च तिपटीने वाढला आहे.

कोल्ड स्टोरेज व प्रक्रिया उद्योगाची गरज

कोल्ड स्टोरेज असल्यास लिंबू साठवून भाव वाढेपर्यंत विक्री पुढे ढकलता येईल.

लिंबू प्रक्रिया उद्योग उभारल्यास कमी भावाच्या काळात लिंबावर प्रक्रिया करून थंड पेये, सायट्रिक अॅसिड, औषधे यांसारखे उत्पादन करता येतील.

लिंबाच्या प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांना नवे उत्पन्न स्रोत मिळतील. 

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

लिंबाची काढणी योग्य टप्प्यावर करावी.

रोग नियंत्रणासाठी शिफारस केलेली फवारणी वेळेवर करावी.

उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी गुणवत्ता तपासा.

शेतकरी गटांनी एकत्र येऊन कोल्ड स्टोरेज वा प्रक्रिया यंत्रणा उभारावी.

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात आडत बाजारात ४ ते ८ हजार रुपये क्विंटलने लिंबू विक्री झाले. मात्र, यंदा सप्टेंबर महिन्यात लिंबाची आवक अधिक असल्याने १ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपये क्विंटलने विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. - एस. डी. पवार, शेतकरी.

परिसरात लिंबू साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता आहे. लिंबू स्वस्त झाले तर त्याची साठवणूक करता यावी. त्यानंतर योग्य भाव मिळाला की, बाजारात विक्रीसाठी आणता येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल.- युवराज आडसूळ, निरीक्षक कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव.

धाराशिव जिल्ह्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना सध्या बाजारभावातील घसरण, वाढलेला खर्च आणि हवामानाच्या प्रतिकूल परिणामांचा तिहेरी फटका बसला आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून लिंबू प्रक्रिया उद्योग, साठवणूक सुविधा व बाजार व्यवस्थापन सुधारणा आवश्यक असल्याचे शेतकरी व तज्ज्ञांचे मत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : तूर बाजारात नरमाई; कसा मिळाला दर जाणून घ्या सविस्तर

Web Title: latest news Limbu Bajar Bhav: Lemon prices have fallen sharply; know how to get the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.