Lal Kanda Market : कांदा बाजारात अजूनही सुधारणा असल्याचे चित्र आहे. उलट कमी अधिक फरकाने दरात घसरण होते आहे. आज जवळपास पाच वाजेपर्यंत ०३ लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये सोलापूर मार्केटमध्ये ५५ हजार क्विंटल तर नाशिक जिल्ह्यात सव्वा लाख क्विंटल एकट्या लाल कांद्याची आवक झाली.
आज सोलापूर मार्केट मध्ये लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ८०० रुपये, लासलगाव मार्केट मध्ये कमीत कमी ५५१ रुपये तर सरासरी ११५१ रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये कमीत कमी ८५० रुपये तर सरासरी ११०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर धुळे आणि देवळा मार्केटमध्ये सरासरी १०५० रुपये दर मिळाला.
तसेच पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ९०० रुपये, इस्लामपूर आणि वाई मार्केटमध्ये ०१ हजार रुपये, कल्याण मार्केटमध्ये नंबर एकच्या कांद्याला १५०० रुपये तर नंबर दोनच्या कांद्याला ११०० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला ११०० रुपये, तर परांडा मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला १ रुपये दर मिळाला.
