Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूरमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक, दर मात्र या मार्केटमध्ये मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:30 IST

Kanda Bajarbhav : आज २० जानेवारी रोजी जवळपास ०२ लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav :    कांदा बाजारात अद्यापही सुधारणा झाली नसल्याचे चित्र आहे. आज २० जानेवारी रोजी जवळपास ०२ लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची तब्बल ७६ हजार क्विंटल तर पोळ कांद्याची २० हजार क्विंटल आवक झाली. 

तसेच सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याची ५० हजार क्विंटल तर दुसरीकडे मुंबई बाजारात ११ हजार क्विंटल तर पुणे बाजारात चिंचवड कांद्याची १७ हजार क्विंटल आवक झाली. 

आज लाल कांद्याला लासलगाव निफाड मार्केटमध्ये कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी 1500 रुपये सोलापूर मार्केट मध्ये कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, नागपूर बाजारात सरासरी १५०० रुपये, कळवण बाजारात सरासरी १५११ रुपये, भुसावळ बाजारात सरासरी १२०० रुपये तर नांदगाव मार्केटमध्ये १२५० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी ९५० रुपये तर जुन्नर आळेफाटा मार्केटमध्ये चिंचवड कांद्याला सरासरी १५०० रुपये, त्याचबरोबर नागपूर मार्केटमध्ये पांढरा कांद्याला २१०० रुपये आणि पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला १४५० रुपये असा दर मिळाला.

 

Read More : जानेवारीचे शेवटचे दहा दिवस तुरीचा बाजारभाव कसा राहील, MSP पेक्षा अधिक मिळणार? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Price: Nashik, Solapur see high arrival, rates vary by market.

Web Summary : Onion prices remain weak despite significant arrivals. Nashik and Solapur lead in red onion supply. Lasalgaon offers ₹1500 average, while Nagpur sees ₹2100 for white onions.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिकसोलापूर