नाशिक : चांदवड येथील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढला असून, शुक्रवारी लिलाव सुरू होताच दर कमी झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या बाहेर अचानक 'रास्ता रोको' आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.
चांदवड बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने शुक्रवारी लिलाव सुरू होताच भाव कोसळले. क्विंटलला केवळ ७०० ते ८०० रुपये, तर काही मालाला १ हजार रुपये दर मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीबाहेरील मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन छेडले. सकाळी कांदा लिलाव सुरू झाला; परंतु दहा वाजताच्या सुमारास अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले.
दरम्यान, इतर अनेक बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा चांदवडमध्ये दाखल झाला होता. आवक वाढल्याने आणि दर घसरल्याने जास्त दरात खरेदी शक्य नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी उसळली. यावेळी नाफेडची खरेदी त्वरित बंद करावी आणि कांद्यास योग्य भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांमध्ये नाराजी
ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे चांदवड तालुक्यातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या काळा शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवला कांदा सुद्धा मोठ्या प्रमाणात सडला. अशा एकंदर परिस्थितून वाचलेला कांदा विकण्यासाठी तालुक्यातील शेतकरी बाजार समिती गाठत आहेत. मात्र, क्विंटलमागे काद्याला अवघे ७०० ते ८०० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
Kanda Market : आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर घसरले! मुंबई, पुण्यात काय दर मिळाले?
