Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Niryat : भारतातील कांदा व्हाया कराची न जाता आता थेट जाणार दुबईत, वाचा सविस्तर

Kanda Niryat : भारतातील कांदा व्हाया कराची न जाता आता थेट जाणार दुबईत, वाचा सविस्तर

Latest News Kanda Niryat Indian onion will now go directly to Dubai instead of going to Karachi | Kanda Niryat : भारतातील कांदा व्हाया कराची न जाता आता थेट जाणार दुबईत, वाचा सविस्तर

Kanda Niryat : भारतातील कांदा व्हाया कराची न जाता आता थेट जाणार दुबईत, वाचा सविस्तर

Kanda Niryat : कांद्याच्या स्थानिक बाजारपेठेवर (Kanda Market) याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

Kanda Niryat : कांद्याच्या स्थानिक बाजारपेठेवर (Kanda Market) याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : भारत सरकारचे परकीय व्यापार महासंचालक आणि अतिरिक्त सचिव अजय भादू यांनी तत्काळ प्रभावाने पाकिस्तानमधून आयात (Pakistan) करण्यावर बंदी घातली असून, याबाबतचे आदेश जारी झाले आहेत. त्यामुळे भारतातून दुबईत (Indian Onion Export To Dubai) जाणारा कांदा कंटेनर आता व्हाया कराची न जाता दुबईतच जाणार आहे. 

कांद्याच्या स्थानिक बाजारपेठेवर (Kanda Market) याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय वाणिज्य महासंचालनालयाच्या फॉरेन ट्रेड विभाग यांनी आयात बंदीबाबत अधिसूचना जारी केली आहे.

पाकिस्तानमधून उद्भवलेल्या किंवा निर्यात केलेल्या सर्व वस्तूंच्या आयात किंवा पारगमनावर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

स्थानिक बाजारपेठेवर परिणाम नाही
भारतातून पाकिस्तानला कांदा पाठविला जात नसल्याने व्यापार बंद आहे, तर पाकिस्तानातून कांदा येतच नाही. त्यामुळे कांदा बाजारपेठेवर या बंदीचा परिणाम जाणवणार नाही. भारतातून दुबईत जाणारे ३० ते ४० टक्के कंटेनर हे व्हाया कराची जातात. आता कराची न जाता सर्वच कंटेनर हे थेट दुबईत जातील, असे कांदा निर्यातदार विकास सिंग यांनी सांगितले.

Web Title: Latest News Kanda Niryat Indian onion will now go directly to Dubai instead of going to Karachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.