Kanda Niryat : बांगलादेशने आपल्या स्थानिक कांद्याची बाजारपेठ स्थिर करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. दोन दिवसांपूर्वी २०० परवाने वाढविण्यात आले होते. यात आणखी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच भारतीय कांद्याची निर्यात वाढण्यास मदत होणार आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देत, बांगलादेश सरकारने पुन्हा एकदा कांद्याच्या आयात परवान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे, ज्यामुळे ही संख्या चौपट झाली आहे. पूर्वी दररोज केवळ ५० आयात परवाने दिले जात होते, त्यानंतर १३ डिसेंबरपासून २०० आयात परवाने जारी करण्यात आले. आता यात वाढ करून ५७५ परवाने दिले जात आहेत.
सरकार १५ आणि १६ डिसेंबर रोजी दररोज ५७५ आयात परवानग्या (IPs) जारी करेल जेणेकरून कांद्याचा बाजार सुसह्य पातळीवर ठेवण्यास मदत होईल. प्रत्येक IP जास्तीत जास्त ३० टन कांदा आयात करण्यास अनुमती देईल.
अर्जाचा विषय पूर्वीप्रमाणेच राहील. ज्या आयातदारांनी १ ऑगस्ट २०२५ पासून आयात परवानगीसाठी अर्ज केला आहे, ते पुढील दोन दिवसांत त्यांचे अर्ज पुन्हा सबमिट करण्यास पात्र असतील. आयातदाराला फक्त एकदाच अर्ज करण्याची परवानगी असेल.
११७५ परवाने दोन दिवसांत दिले होतील, म्हणजेच ११७५ ट्रक रवाना होतील. एका आयपीला किंवा आयातदाराला ३० टन कांदा इम्पोर्ट करता येणार आहे. या निर्णयामुळे भारतातून कांद्याच्या निर्यातीला लक्षणीय चालना मिळण्याची अपेक्षा आहे आणि देशांतर्गत बाजारात किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
Read More : Kanda Bajarbhav : रविवारी पुणे मार्केटमध्ये आवक वाढली, वाचा आजचे कांदा बाजारभाव
