Join us

Kanda Market Update : पुणे, नगर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 17:01 IST

Kanda Market Update : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Bajarbhav) 61 हजार 539 क्विंटल आवक झाली.

Kanda Market Update : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Bajarbhav) 61 हजार 539 क्विंटल आवक झाली. यात अहमदनगर जिल्ह्यात 24 हजार क्विंटल, तर पुणे बाजारात चिंचवड कांद्याची 12 हजार आणि लोकल कांद्याचे 19 हजार क्विंटल च्या झाली तर कांद्याला कमीत कमी 1500 रुपयापासून ते 2500 रुपयापर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 04 हजार 500 रुपये दर मिळाला.

आज रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी पारनेर आणि भुसावळ बाजारात (Red Onion Market) लाल कांद्याला 2200 रुपये दर मिळाला. तर राहता बाजारात 1750 रुपये दर मिळाला. तर रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी 04 हजार 500 रुपयांचा दर मिळाला.

तर लोकल कांद्याला पुणे बाजारात (Pune Kanda Market) 2100 रुपये, पुणे-खडकी बाजारात 2700 रुपये, पुणे-पिंपरी बाजारात 1900 रुपये आणि मंगळवेढा बाजारात 1500 रुपये दर मिळाला.  जुन्नर-आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला 2200 रुपये तर सर्वसाधारण कांद्याला छत्रपती संभाजीनगर बाजारात 1500 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/12/2024
अहमदनगरलालक्विंटल2426040029501975
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल421350025001500
जळगावलालक्विंटल13200030002200
नागपूरउन्हाळीक्विंटल40400050004500
पुणे---क्विंटल169760030002500
पुणेलोकलक्विंटल19031125029752113
पुणेचिंचवडक्विंटल12279110032102200
सोलापूरलोकलक्विंटल620021101500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)61539
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीनाशिकपुणे