Join us

Kanda Market : लासलगाव, सोलापूर कांदा बाजारात मागील आठवड्यात काय दर मिळाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:39 IST

Kanda Market : मागील आठवड्यात या दोन्ही कांदा मार्केटला काय परिस्थिती होती, दर कसे मिळाले ते पाहुयात... 

Kanda Market :  उन्हाळ असो की लाल असो दोन्ही कांदा बाजारात घसरण सुरु आहे. एकीकडे नाशिक जिल्ह्यातील बाजारात उन्हाळ कांद्याला दर कमी असून सोलापूर जिल्ह्यात (Solapur Market) लाल कांदा दर स्थिर आहेत, पण ते कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. मागील आठवड्यात या दोन्ही कांदा मार्केटला काय परिस्थिती होती, दर कसे मिळाले ते पाहुयात... 

नाशिकच्यालासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात २२ जुलै रोजी सरासरी १४५१ रुपये, २३ जुलै रोजी १४०० रुपये, २४ जुलै रोजी १४२५ रुपये, २५ जुलै रोजी १३७५ रुपये, २६ जुलै रोजी १३७५ रुपये, २८ जुलै रोजी १२७५ रुपये तर आज २९ जुलै रोजी १३०१ रुपये तर ३० जुलै रोजी १३२० रुपये दर मिळाला.

म्हणजेच लासलगाव बाजारात मागील आठवड्यात सरासरी किंमती १४२७ प्रति क्विंटल होत्या. त्या आजमितीस १३२० रुपयांवर येऊन ठेपल्या आहेत. म्हणजेच आजच्या दरानुसार मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ८ टक्क्यांनी घट झाली आहे.

तर मागील आठवड्याचा सोलापूर बाजाराचा विचार करता २३ जुलै रोजी सरासरी एक हजार रुपये, २४ जुलै रोजी एक हजार रुपये, २५ जुलै रोजी ११०० रुपये, २६ जुलै रोजी १०५० रुपये, २८ जुलै रोजी ११०० रुपये, २९ जुलै रोजी एक हजार रुपये दर मिळाला. या बाजारात दर स्थिर आहेत. मात्र समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. 

Kanda Market : ऑगस्ट महिन्यात कांद्याला काय दर मिळतील, परिस्थिती काय राहील? वाचा सविस्तर

टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरशेती क्षेत्र