Kanda Market : आज ०३ मे रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची २७ हजार क्विंटल आवक झाली. बाजारभाव आजही जैसे थे आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची १४ हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली.
यामध्ये पारनेर मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी २०० रुपये, सरासरी ९७५ रुपये, अकोले मार्केटमध्ये कमीत कमी २०० रुपये, तर सरासरी १०५१ रुपये, मंगळवेढा मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी एक हजार रुपये वाई आणि पुणे पिंपरी मार्केटमध्ये ८५० रुपये दर मिळाला.
छत्रपती संभाजी नगर मार्केटमध्ये कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी ५५० रुपये, शिरूर कांदा मार्केटमध्ये कमीत कमी २०० रुपये सरासरी ८०० रुपये आणि सातारा मार्केटमध्ये कमीत कमी ७०० रुपये, सरासरी १ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.
