Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : हैदराबाद मार्केटला जुन्या-नव्या कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Market : हैदराबाद मार्केटला जुन्या-नव्या कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Latest news Kanda Market price Hyderabad market getting for old and new onions Read in detail  | Kanda Market : हैदराबाद मार्केटला जुन्या-नव्या कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Market : हैदराबाद मार्केटला जुन्या-नव्या कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Market : अशात तेलंगणातील हैदराबाद कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळत आहे, ते देखील जाणून घेऊयात.

Kanda Market : अशात तेलंगणातील हैदराबाद कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळत आहे, ते देखील जाणून घेऊयात.

Kanda Market : एकीकडे राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला (Kanda Bajarbhav) समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र आहे तसेच नाशिक जिल्ह्यासह सोलापूर कांदा मार्केटला चांगली आवक सुरू आहे. तर दुसरीकडे हैदराबाद मार्केटला कांद्याला कमीत कमी 2500 रुपयांपासून ते 06 हजार 800 रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. 

बांगला बॉर्डर खुली झाल्यानंतर कांद्याची आवक (Onion Arrival) वाढली असून दरही समाधानकारक आहेत. अशात हैदराबाद कांदा मार्केटमध्ये काय भाव मिळत आहे ते देखील जाणून घेऊयात. काल 11 नोव्हेंबर रोजी 125 गाड्यांची आवक झाली. यात जुना कांदा, कर्नाटकातून नवीन कांदा आणि महाराष्ट्रातील कांदा (Nashik Kanda Market) यांचा समावेश होता. 

यात जुन्या कांद्याला कमीत कमी 3500 रुपयापासून ते सरासरी 6800 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर नवीन कांद्याला 2500 रुपयांपासून 04 हजार 800 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर मोठा कांद्याच्या एका वक्कलास 05 हजार ते 05 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळाला आणि महाराष्ट्रातील कांद्याला 02 हजार रुपयांपासून ते 04 हजार 200 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज नाशिकमधील सकाळ सत्रातील दर

आज 12 नोव्हेंबर रोजी सकाळ सत्रात नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 03 हजार 700 रुपये तर सरासरी 05 हजार 600 रुपये आणि लाल कांद्याला कमीत कमी 2500 रुपये आणि सरासरी 3800 रुपये दर मिळाला. दुसरीकडे सिन्नर नायगाव बाजारात उन्हाळ  कांद्याला कमीत कमी 02 हजार 200 तर सरासरी 5 हजार 750 रुपये तर लासलगाव बाजारात लासलगाव बाजारात कमीत कमी 04 हजार रुपये तर सरासरी 5 हजार 851 रुपये दर मिळाला.

हेही वाचा : Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ आणि पोळ कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Web Title: Latest news Kanda Market price Hyderabad market getting for old and new onions Read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.