Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : बांगलादेशकडून कांदा आयात सुरु झाली? बॉर्डरवर काय परिस्थिती, वाचा सविस्तर

Kanda Market : बांगलादेशकडून कांदा आयात सुरु झाली? बॉर्डरवर काय परिस्थिती, वाचा सविस्तर

Latest News Kanda Market Permission to import onions from Bangladesh see details | Kanda Market : बांगलादेशकडून कांदा आयात सुरु झाली? बॉर्डरवर काय परिस्थिती, वाचा सविस्तर

Kanda Market : बांगलादेशकडून कांदा आयात सुरु झाली? बॉर्डरवर काय परिस्थिती, वाचा सविस्तर

Kanda Market : एकीकडे भारतीय कांदा (Kanda Market) बाजारात काहीशी सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Kanda Market : एकीकडे भारतीय कांदा (Kanda Market) बाजारात काहीशी सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : एकीकडे भारतीय कांदा (Kanda Market) बाजारात काहीशी सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे बांगलादेश सरकारने स्थानिक व्यापाऱ्यांना आयातीचा परवाना दिल्याचे समजते आहे. त्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात चालू झाली आहे. मात्र ही निर्यात सद्यस्थितीत किरकोळ स्वरूपाची असल्याचे कांदा निर्यातदार, व्यापारी यांचे म्हणणे आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा बाजारात (Nashik Kanda Market) घसरण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकार आयातीला परवानगी देऊन भारतीय कांद्याची निर्यात होईल, अशी आशा होती. त्याचबरोबर बांगलादेशमध्ये कांद्याच्या किंमती वाढत असल्याने यावर आळा घालण्यासाठी तेथील वाणिज्य मंत्रालयाने आयात परमिट (IP) ला देखील मंजुरी मिळाल्याचे दिल्याचे समजते आहे. जवळपास आठ महिन्यांनंतर भारतातून आयात पुन्हा सुरू झाली असून स्थानिक ठिकाणी किंमती स्थिर होण्यास मदत होणार आहे. 

याबाबत बांगलादेश येथील स्थानिक वृत्त वाहिनीने एक दिलेल्या वृत्तानुसार ढाका येथील श्याम बाजारमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, कांद्याच्या किमती ७ ते १० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. शिवाय भारतीय निर्यातदारांकडून गाड्या पाठ्वण्यास सुरवात झाली असून काही गाड्या बॉर्डरवर पोहचल्या आहेत . तसेच काही गाड्या भरण्याची तयारी सुरु असल्याची माहिती एका व्यापाऱ्याकडून मिळाली.   

बाजारपेठेवर होणारा परिणाम
स्थानिक बंगाली व्यापाऱ्यांच्या मते, केवळ आयात परमिटच्या बातमीनेच कांद्याचे दर प्रति किलो 10 टक्यांपर्यंत कमी होऊ शकतात. लवकरच बाजारात भारतीय कांदा दाखल झाल्यावर दरात आणखी घट अपेक्षित आहे. यामुळे कांद्याची साठेबाजी आणि किमतींवरील सट्टेबाजी कमी होऊन एक 'मानवनिर्मित संकट' टळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दोन दिवसांपासून बांगलादेशकडून कांदा आयात चालू झाली आहे. जवळपास सातशे गाडी बॉर्डरवर उभी असल्याचे समजते आहे. बॉर्डर देखील चालू झाली आहे. लवकरच ही निर्यात सुरळीत होईल, असा अंदाज आहे. 
- विकास सिंग, उपाध्यक्ष, कांदा निर्यातदार , नाशिक 

Web Title: Latest News Kanda Market Permission to import onions from Bangladesh see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.