Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : कांदा उत्पादक दुहेरी संकटात; भाव पडले, बीजोत्पादन धोक्यात

Kanda Market : कांदा उत्पादक दुहेरी संकटात; भाव पडले, बीजोत्पादन धोक्यात

latest news Kanda Market: Onion producers in double crisis; Prices fall, seed production in danger | Kanda Market : कांदा उत्पादक दुहेरी संकटात; भाव पडले, बीजोत्पादन धोक्यात

Kanda Market : कांदा उत्पादक दुहेरी संकटात; भाव पडले, बीजोत्पादन धोक्यात

Kanda Market : कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या दुहेरी संकटात सापडले आहेत. बाजारात दर कोसळल्याने उत्पादन खर्चही निघत नाही, तर मधमाश्यांच्या कमतरतेमुळे कांदा बीजोत्पादनावरही मोठा धोका निर्माण झाला आहे. कमी भाव आणि घटणारे उत्पादन यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून तातडीच्या सरकारी मदतीची मागणी जोर धरत आहे. (Kanda Market)

Kanda Market : कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या दुहेरी संकटात सापडले आहेत. बाजारात दर कोसळल्याने उत्पादन खर्चही निघत नाही, तर मधमाश्यांच्या कमतरतेमुळे कांदा बीजोत्पादनावरही मोठा धोका निर्माण झाला आहे. कमी भाव आणि घटणारे उत्पादन यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून तातडीच्या सरकारी मदतीची मागणी जोर धरत आहे. (Kanda Market)

Kanda Market : कांदा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि बाजारपेठ अशा दुहेरी संकटात सापडले आहेत. एका बाजूला बाजारात कांद्याचे भाव कोसळले असून दुसऱ्या बाजूला मधमाश्यांच्या कमतरतेमुळे कांदा बीजोत्पादन धोक्यात आले आहे.(Kanda Market)

उत्पादन घट आणि कवडीमोल दर या दुहेरी फटक्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी होत आहे.(Kanda Market)

लासूर स्टेशनमध्ये कांद्याचे दर कोसळले

लासूर स्टेशन बाजार समितीत लाल कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. सध्या कांद्याला फक्त ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे संतप्त शेतकऱ्यांनी कांदा विक्रीकडे पाठ फिरवली आहे.

शुक्रवारी बाजारातील स्थिती

कांदा प्रकारकिमान भावकमाल भावसरासरी भाव
लाल कांदा सुपर५५० रु.१,०६५ रु.८०० रु.
लाल कांदा गोल्टी२०० रु.३३० रु.२४० रु.

(भाव प्रति क्विंटल)

दर घसरल्यामुळे बाजारातील आवकही कमी झाली आहे. लासूर स्टेशनमध्ये कांद्याची आवक ५०० वाहनांवरून २५५ वाहनांपर्यंत खाली आली आहे.

लाल कांदा साठवून ठेवणे कठीण असल्याने शेतकऱ्यांना तो विकणे भाग पडते. मात्र, १ हजार रुपयांच्या आत दर मिळत असल्याने शेतात पडलेला कांदा बाजारात आणावा की नाही, अशी विवंचना शेतकऱ्यांमध्ये आहे.

सिल्लोडमध्ये कांदा बीजोत्पादन धोक्यात

सिल्लोड तालुक्यात कांदा बीजोत्पादनावरही निसर्गाचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या पीक फुलोऱ्यात असताना परागीकरणासाठी आवश्यक असलेल्या मधमाश्यांची संख्या अत्यल्प दिसून येत आहे.

कांदा सीड उत्पादनासाठी मधमाश्यांद्वारे होणारे परागीकरण अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, यंदा हवामानातील बदलामुळे मधमाश्यांचा वावर कमी झाल्याने बियाणे भरण्याचे प्रमाण घटण्याची भीती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनी मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी या उपाययोजना कराव्यात

गुळाची फवारणी

ताकाचा वापर

वेलची मिश्रण

यांसारखे उपाय केले, परंतु अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत.

वाढता खर्च, घटते उत्पादन

बीजोत्पादनासाठी बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च आधीच वाढलेला आहे. त्यातच परागीकरण कमी झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कृषी विभागाचा सल्ला

तालुका कृषी अधिकारी डॉ. संदीप जगताप यांनी शेतकऱ्यांना काही उपाय सुचवले आहेत.

* कांदा फुलांवर हलक्या हाताने सुती कापड फिरवणे

* सकाळी गुळाच्या पाण्याची वाफ देणे

* शेतात मोहरीची लागवड करणे

या उपायांमुळे मधमाशा आकर्षित होऊन परागीकरणास मदत होऊ शकते.

शेतकऱ्यांची मागणी

दर कोसळल्याने आणि बीजोत्पादन धोक्यात आल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे लाल कांद्याला विशेष अनुदान जाहीर करावे आणि तातडीची मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सध्या भाव पडले आणि उत्पादनही घटण्याची शक्यता निर्माण झाल्याने कांदा उत्पादकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

हे ही वाचा सविस्तर :Vegetable Market : टोमॅटो-वांग्याची आवक वाढली; कसे मिळाले दर वाचा सविस्तर

Web Title : प्याज किसान दोहरे संकट में: कीमतें गिरीं, बीज उत्पादन खतरे में।

Web Summary : प्याज किसान कम कीमतों और मधुमक्खियों की कमी से बीज उत्पादन खतरे में आने से परेशान हैं। बाजार में ₹700-₹800 प्रति क्विंटल की दर लागत को पूरा नहीं करती। किसान बढ़ते खर्चों और संभावित उपज में गिरावट के बीच तत्काल सरकारी सहायता का अनुरोध करते हैं।

Web Title : Onion farmers face double crisis: prices plummet, seed production threatened.

Web Summary : Onion farmers are in distress due to falling prices and threatened seed production from reduced bee populations. Low market rates, around ₹700-₹800 per quintal, fail to cover costs. Farmers request immediate government assistance amid rising expenses and potential yield declines.