Join us

Kanda Bajar Bhav : कांदा दर 9 टक्क्यांनी घसरले, मागील आठवड्यात दर कसे होते? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 15:10 IST

Kanda Bajar Bhav :

Kanda Bajar Bhav : कांदा बाजारात सातत्याने घसरण (Onion Prices Down) सुरूच आहे. एकीकडे शेतकरी समाधानकारक दराच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे कांदा दरात सुधारणा दिसून येत नसल्याचे चित्र आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ७ टक्क्यांनी घट झाली आहे.

देशपातळीवरव राज्यात कांद्याच्या आवकमध्ये (Kanda Arrival) मागील आठवड्याच्या तुलनेत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मागील आठवड्यात लासलगाव बाजारात कांद्याच्या किंमती ११८८ रुपये प्रति क्विंटल अशा सर्वाधिक होत्या, तर सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) कांद्याच्या किंमती ७०० रुपये प्रति क्विंटल होत्या. 

तर मागील आठवड्यात कांद्याच्या किंमती पाहिल्या तर सोलापूर बाजारात केवळ ७०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात ११८० रुपये, अहिल्यानंगर बाजारात ७७५ रुपये, तर पुणे बाजारात ९६० रुपये दर होता. 

मागील आठवड्यातील कांदा बाजारभावाशी आजच्या कांदा बाजाराची तुलना केली तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे कमीत  कमी कमीत कमी पाचशे तर सरासरी ११५० रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारात बाजारात उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे कमीत कमी ४०० तर सरासरी ११५० रुपये दर मिळाला. 

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर