Join us

Kanda Market : मागील सहा दिवसांत कांदा आवक किती झाली, काय दर मिळाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 13:45 IST

Kanda Market : या आठवड्यात राज्यात कांदा आवक किती झाली? बाजारात दर काय मिळाले, हे पाहुयात... 

Kanda Market : एकीकडे कांदा बाजारात (Kanda Bajar) किंचितशी सुधारणा दिसून येऊ लागली आहे. आज रविवार असल्याने काही निवडक बाजारात कांदा अवाक होईल. पण तत्पूर्वी या आठवड्यात म्हणजेच ११ ऑगस्ट पासून ते १५ ऑगस्टपर्यंत राज्यात कांदा आवक किती झाली? आणि काही बाजारात दर काय मिळाले, हे पाहुयात... 

राज्यातील कांदा बाजारात (Maharashtra Kanda Market) सोमवार ११ ऑगस्ट रोजी २ लाख ४७ हजार ३०० क्विंटल आवक झाली. त्यानंतर अनुक्रमे मंगळवार १२ ऑगस्ट रोजी २ लाख ४६ हजार क्विंटल, बुधवार १३ ऑगस्ट रोजी ३ लाख ३२ हजार ५७३ क्विंटल झाली.  

गुरुवार १४ ऑगस्ट रोजी ३ लाख ४० हजार ९८४ क्विंटल, शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी २० हजार २९४ क्विंटल तर काल शनिवार १६ ऑगस्ट रोजी २ लाख ४७ हजार ३१४ क्विंटल आवक झाली. यानुसार या आठवड्यात सरासरी अडीच लाख क्विंटल कांदा आवक झाली. केवळ १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने कमी आवक झाली. 

लासलगाव बाजारात काय दर होते? तसेच लासलगाव बाजारातील या आठवड्यातील सरासरी दर पाहिले तर लासलगाव बाजारात ११ ऑगस्ट रोजी १३५१ रुपये, १२ ऑगस्ट रोजी १५२५ रुपये, १३ ऑगस्ट रोजी १७०१ रुपये, १४ ऑगस्ट रोजी १६०० रुपये, १५ ऑगस्ट रोजी सुट्टी, तर १६ ऑगस्ट रोजी १५७५ रुपये दर मिळाला. 

टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकमहाराष्ट्रशेती क्षेत्र