Kanda Market In Diwali : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या काळात मजूर वर्ग गावी जात असल्याने अनेक बाजार समित्या बंद असतात. परिणामी लिलावही बंद ठेवले जातात. यंदाची दिवाळी काही दिवसांवर आली असून या काळात तीन चार दिवस बाजार समित्या बंद राहणार आहे.
कांदा मार्केट म्हटलं तर लासलगाव मार्केट महत्वाचे समजले जाते. त्यांनतर पिंपळगाव, सोलापूरसह इतर बाजार समित्यांमध्ये कांदा लिलावसह इतर भाजीपाल्याचे लिलाव होत असतात. दिवाळीनिमित्त लासलगाव, सोलापूर, पिंपळगाव बसवंत, नांदुरी आदी बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद राहणार आहेत.
श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सर्व आडते व्यापारी माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट व शेतकरी यांना कळविण्यात येते की रविवार १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत दीपावली सणानिमित्त मार्केट यार्ड बंद राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
शुक्रवार १७ ऑक्टोबरपासून ते गुरुवार २३ ऑक्टोबरपर्यंत दीपावली सण असल्याने कांदा लिलावाचे कामकाज बंद राहतील, अशी सूचना छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा बाजार आवार लासलगाव यांनी केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत उप बाजार आवार सायखेडा यांच्यामार्फत सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी व आदी मार्केट घटकांना जाहीर करण्यात येते की शुक्रवार १७ ऑक्टोबरपासून ते गुरूवार २३ ऑक्टोबरपर्यंत व्यापारी अर्जानुसार दिपावली सणानिमीत कांदा लिलाव बंद राहतील. तसेच शुक्रवार २४ ऑक्टोबरपासुन कांदा लिलाव पुर्ववत सुरू राहील.
नांदुरी कृषी मार्केट,कळवण यांच्यामार्फत सर्व शेतकरी व्यापारी, आडते, हमाल, मापाडी, गाडी चालक-मालक यांना कळविण्यात येते की दिपावली सणानिमित्त १६ ऑक्टोबरपासून ते शुक्रवार २४ ऑक्टोबरपर्यंत कांदा मार्केट बंद राहील. त्यानंतर सोमवार २७ ऑक्टोबरपासून कांदा लिलाव पूर्ववत प्रमाणे सुरू होईल, याची सर्व बाजार घटकांनी नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.