Kanda Lagwad :सध्या लाल कांद्याच्या लागवडीची लगबग सुरू आहे. तरी वाढलेला खर्च शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. रोपांचे वाढलेले दर, मजुरी, खत आणि गाडीभाडे यामुळे एकरी खर्च तब्बल ३२ हजार रुपयांवर गेला आहे.
मात्र, कांद्याचे भाव स्थिर नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात मोठी धाकधूक निर्माण झाली आहे. (Kanda Lagwad)
वैजापूर तालुक्यात सध्या लाल कांद्याच्या लागवडीची लगबग सुरू आहे. मूग पिकाची मळणी संपल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी शेतांची नांगरणी करून ती कांदा लागवडीसाठी तयार केली आहेत. मात्र, यंदा कांदा लागवडीचा खर्च प्रचंड वाढल्याने शेतकरी चिंतेत आले आहेत. (Kanda Lagwad)
एकरी सरासरी ३० ते ३२ हजार रुपये खर्च होत असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत.(Kanda Lagwad)
कांद्याच्या लागवडीसाठी मोठा खर्च
कांदा लागवडीसाठी लागणारे रोप, मजुरी, खत, गाडीभाडे या सर्व बाबींच्या दरात वाढ झाली आहे. विशेषतः कांदा रोपांच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. (Kanda Lagwad)
यंदा एकरी लागवडीसाठी केवळ रोपांचा खर्चच तब्बल २५ हजार रुपयांपर्यंत जात आहे. याशिवाय खत, मजुरी, नांगरणी, गाडीभाडे या बाबींचा खर्च धरल्यास एकरी लागवडीचा खर्च ३२ हजार रुपयांवर जाऊन पोहोचतो.
शेतकऱ्यांची चिंता कायम
कांद्याचे बाजारभाव स्थिर नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत.
हमीभावाशिवाय कांदा लागवड करणे म्हणजे मोठा जोखीम आहे. कांदा लागवडीसाठी मजुरी, रोपे, खत यांचा प्रचंड खर्च होत असून, भाव घसरल्यास मोठे नुकसान सोसावे लागते.- अक्षय केशव राऊत, शेतकरी
एकरी कांदा लागवडीचा खर्च (अंदाजे)
रोटावेटर : १,५०० रु.
खत : २,८०० रु.
रोपे : २५,००० रु.
मजूर व इतर : २,७०० रु.
एकूण खर्च : ३२,००० रुपये
भविष्यातील प्रश्न
कांद्याला बाजारात योग्य भाव मिळाला तरच हा वाढलेला खर्च वसूल होईल, अन्यथा शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या लाल कांद्याच्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Kanda Market : कांद्याच्या आवकेत चढ-उतार; 'या' बाजारात दर सुधारले वाचा सविस्तर