Join us

Kanda Market : पुणे-पिंपरी बाजारात कांद्याला क्विंटलमागे काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:53 IST

Kanda Market : आज रविवार रोजी राज्यातील कांदा बाजारात काय भाव मिळाले? ते पाहुयात..

Kanda Market : आज 01 जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये 25 हजार क्विंटल कांदा (Kanda Avak) आवक झाली. रविवार असल्याने अनेक बाजार समितीमध्ये लिलाव बंद होते. आज कमीत कमी 600 रुपये पासून ते सरासरी 1350 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज रविवारी आवक कमी झाल्याचे दिसून आलं. यात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) पारनेर बाजारात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1275 रुपये, भुसावळ बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1200 रुपये, तर राहता बाजारात कमीत कमी 400 रुपये तरी सरासरी 1250 रुपये दर मिळाला. 

तसेच जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर सरासरी १३५० रुपये पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी तेराशे रुपये आणि पुणे मोशी बाजारात कमीत कमी चारशे रुपये त्याला सरासरी एक हजार रुपयांचा दर मिळाला. 

आज जुन्नर-आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याची 11 हजार क्विंटल तर पारनेर बाजारातून हा कांद्याची 12 हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. 

वाचा आजचे बाजारभाव

टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकपुणेशेती क्षेत्र