Harbhara Market : आज ०४ एप्रिल रोजी लोकल हरभऱ्याला देऊळगाव राजा मार्केटमध्ये सरासरी ०५ हजार २०० रुपये, परंडा मार्केटमध्ये ०५ हजार रुपये, कोपरगाव मार्केटमध्ये ५ हजार ३११ रुपये, भोकरदन मार्केटमध्ये ५ हजार २०० रुपये, मुंबई मार्केटमध्ये ७ हजार २०० रुपये तर अमरावती मार्केटमध्ये ०५ हजार २१० रुपये दर मिळाला.
तर लाल हरभऱ्याला जिंतूर मार्केटमध्ये ५ हजार १२५ रुपये, धुळे मार्केटमध्ये ५ हजार ९८५ रुपये, लातूर मार्केटमध्ये ५ हजार ४८५ रुपये, उमरखेड मार्केटमध्ये पाच हजार रुपये दर मिळाला.
तसेच चाफा हरभऱ्याला जळगाव मार्केटमध्ये ४ हजार ९०० रुपये, चिखली मार्केटमध्ये ०४ हजार ९५० रुपये, सोलापूर मार्केटमध्ये गरडा हरभऱ्याला ५ हजार १७५ रुपये, छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये ५ हजार ६२ रुपये दर मिळाला.
तर जालना मार्केटमध्ये काबुली हरभऱ्याला ७ हजार ३२५ रुपये, मालेगाव मार्केटमध्ये काट्या हरभऱ्याला ४८०१ रुपये तर तुळजापूर मार्केटमध्ये ०५ हजार २०० रुपये दर मिळाला.
