नंदुरबार : गव्हाच्या (Wheat) तुलनेत पचायला हलकी व कमी कॅलरी असलेले धान्य म्हणून दररोजच्या आहारात ज्वारी व दादरला पसंती देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वीच्या तुलनेत गव्हाचे उत्पादन मुबलक असले तरी, बाजारात गव्हापेक्षा दादर आणि ज्वारीला चांगले दर मिळत असून, गव्हापेक्षा (Jwari Market) ज्वारीची श्रीमंती सध्या तरी वाढली आहे.
बाजारात सध्या ज्वारी (Sorgham Market) १ हजार ९८० ते २ हजार ४०० तर सफेद ज्वारी २ हजार ९२५ ते ३ हजार २४० रुपये आणि दादरला २ हजार १३३ रुपये भाव मिळत आहे. तर गहू २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. गत वर्षाच्या तुलनेत ज्वारीच्या दरात वाढ झाली आहे. पूर्वीच्या काळी ज्वारी, लाल ज्वारी हे गरिबांच्या आहारातील मुख्य घटक होते. गव्हाच्या तुलनेत स्वस्त असल्याने गोरगरीब व मोलमजुरी करणाऱ्यांपासून ते मध्यमवर्गीय सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दररोजच्या जेवणात दादर आणि ज्वारीच्या भाकरीचा समावेश होता.
आरोग्यासाठी ठरते लाभदायक
बद्धकोष्ठता, मूळव्याध, अपचन, वजनवाढीच्या समस्यांपासून मुक्तीसाठी दादर आणि ज्वारीची भाकरी खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते. रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयोगी पडते. आरोग्य जपायचे असेल तर दादर आणि ज्वारीची भाकरी खाणे गरजेचे आहे.
असे आहेत बाजारात दर
सध्या बाजार समितीत ज्वारी १ हजार ९८० ते २ हजार ४०० रुपये, तर सरासरी २ हजार २०० रुपये भाव मिळत आहे. सफेद ज्वारी २ हजार ९२५ ते ३ हजार २४० रुपये तर सरासरी ३ हजार ५० रुपये भाव मिळत आहे. दादर २ हजार १३३ रुपये प्रति क्चिटल दराने खरेदी करण्यात येत आहे.
Kanda Market Update : अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव