Lokmat Agro >बाजारहाट > Jamun Pear Fruit Market : फळबाजारात जांभूळ आणि पेरीचा तडका; दर बदलाचे संकेत वाचा सविस्तर

Jamun Pear Fruit Market : फळबाजारात जांभूळ आणि पेरीचा तडका; दर बदलाचे संकेत वाचा सविस्तर

latest news Jamun Pear Fruit Market: Jamun and pear prices in the fruit market; Read the details of price changes | Jamun Pear Fruit Market : फळबाजारात जांभूळ आणि पेरीचा तडका; दर बदलाचे संकेत वाचा सविस्तर

Jamun Pear Fruit Market : फळबाजारात जांभूळ आणि पेरीचा तडका; दर बदलाचे संकेत वाचा सविस्तर

Jamun Pear Fruit Market : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बाजारपेठा जांभूळ आणि पेरीसारख्या पौष्टिक फळांनी गजबजल्या आहेत. औषधी गुणधर्म आणि चवदारपणामुळे या फळांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दररोज वाढणाऱ्या आवकेमुळे दरात घसरणीची चिन्हे दिसत आहेत. (Jamun Pear Fruit Market)

Jamun Pear Fruit Market : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बाजारपेठा जांभूळ आणि पेरीसारख्या पौष्टिक फळांनी गजबजल्या आहेत. औषधी गुणधर्म आणि चवदारपणामुळे या फळांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दररोज वाढणाऱ्या आवकेमुळे दरात घसरणीची चिन्हे दिसत आहेत. (Jamun Pear Fruit Market)

शेअर :

Join us
Join usNext

Jamun Pear Fruit : पावसाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठांमध्ये विविध हंगामी फळांची रेलचेल सुरू झाली आहे. उन्हाळ्याच्या शेवटी आंबा मागे पडताच आता जांभूळ आणि पेरी या पावसाळी फळांनी बाजारपेठा व्यापायला सुरुवात केली आहे. (Jamun Pear Fruit Market)

यंदा जांभळाचे दर सुरुवातीस प्रतिकिलो ४०० रुपये होते. मात्र, सध्या या दरात काहीशी घट झाली आहे. दुसरीकडे, पेरी फळाचे दर स्थिर असून, प्रतिकिलो ३०० रुपये एवढ्या दराने त्याची विक्री होत आहे.(Jamun Pear Fruit Market)

औषधी गुणधर्म आणि चविष्टपणामुळे पेरी व जांभळाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, दररोज वाढणारी आवक लक्षात घेता लवकरच दरात घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.(Jamun Pear Fruit Market)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ‘पेरी’

पेरी हे फळ केवळ चविष्टच नव्हे, तर आरोग्यदायी गुणधर्मांनी भरलेले आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स यांसारखी पोषणतत्त्वे असतात. यामुळे पेरी फळ नियमित खाल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो, रक्तदाब नियंत्रणात राहतो, आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. तसेच, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचाही उल्लेख तज्ज्ञांकडून केला जातो.

पेरीच्या विविध रंगांनुसार चव आणि गोडी वेगवेगळी असते. त्यामुळे नागरिकांमध्ये या फळाची चव घेण्यासाठी उत्सुकता वाढली असून विक्रीत झपाट्याने वाढ होत आहे.

जांभळाची आवक वाढती 

परभणी येथील गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, क्रांती चौक, वसमत रोड, काळी कमान, भाजी मंडई अशा प्रमुख ठिकाणी जांभळाची विक्री केली जात आहे. 

दररोज जांभळाची आवक वाढत आहे. सध्या बाजारात तुरट आणि गोड अशी मिश्र चव असलेले जांभूळ उपलब्ध असून, व्यापाऱ्यांच्या मते लवकरच याचे दर आणखी कमी होऊ शकतात.

इतर जिल्ह्यांतून आवक, स्थानिक उत्पादकही सक्रिय

बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जांभळाची आवक होत असून, गंगाखेड, पालम आदी भागांतूनही जांभूळ परभणीत विक्रीसाठी येत आहेत. स्थानिक शेतकरी आणि विद्यापीठ परिसरातील शेतशिवारातूनही आवक सुरू आहे. यामुळे स्थानिक उत्पादनाला बाजारपेठ मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

किरकोळ बाजारात दर थोडे अधिक

घाऊक बाजारात दर कमी असले तरी किरकोळ विक्रीत किंचित चढे दर आकारले जात असल्याचे दिसून येते. यामध्ये पेरी ३०० रुपयांपर्यंत, तर जांभूळ सध्या २०० ते ३०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Dhulaperani : धुळपेरणीचा मुहूर्त! मृग नक्षत्रात शेतात कपाशीची लगबग वाचा सविस्तर

Web Title: latest news Jamun Pear Fruit Market: Jamun and pear prices in the fruit market; Read the details of price changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.