Lokmat Agro >बाजारहाट > Agriculture News : पर्यटनापाठोपाट टर्कीमधील फळे बाजारातून गायब, कोटींची उलाढाल ठप्प 

Agriculture News : पर्यटनापाठोपाट टर्कीमधील फळे बाजारातून गायब, कोटींची उलाढाल ठप्प 

Latest News india pak issue Fruits from Turkey disappear from market after tourism | Agriculture News : पर्यटनापाठोपाट टर्कीमधील फळे बाजारातून गायब, कोटींची उलाढाल ठप्प 

Agriculture News : पर्यटनापाठोपाट टर्कीमधील फळे बाजारातून गायब, कोटींची उलाढाल ठप्प 

Agriculture News : भारताच्या रूपाने कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर तुर्कीने पाणी सोडल्याचे स्पष्ट झाले आहे.

Agriculture News : भारताच्या रूपाने कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर तुर्कीने पाणी सोडल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर तुर्की आणि उजबेकिस्तान यांनी पाकिस्तानला (Pakistan) दिलेल्या पाठिंब्याचे आर्थिक पडसाद उमटू लागले असून, पर्यटनापाठोपाट टर्कीमधील फळे बाजारातून गायब होऊ लागले आहेत. 

मुंबईतील व्यापाऱ्यांनी तुर्कीतील फळांची खरेदी (Fruit Market) बंद केल्याने येत्या काही दिवसांत सफरचंदाचे भाव वाढण्याची शक्यता असून पीच, पेर आणि सफरचंद बाजारातून (Turkey Apple Market) गायब होऊ लागले आहेत. तर तुर्कीमधून याणारे कॅप्रीकॉट हे एकमेव ड्रायफ्रूटही बाजारातून दिसेनाशे झाले आहे. परिणामी, भारताच्या रूपाने कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर तुर्कीने पाणी सोडल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारत-पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर टर्की आणि उजबैकिस्तान यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यानंतर भारतातील पर्यटकांनी टर्की आणि उजबेकिस्तानमध्ये आपली सहल रद्द केली होती. तर या क्षेत्रातील व्यावसायिकांनी त्या भागातील सहलीच रद्द केल्या होत्या. त्यापेक्षा देशातील पर्यायी स्थळांचा वापर करण्याची सूचना पर्यटकांना केली होती.

त्याचा फटका बसल्यानंतर आता टक्रीमधून येणाऱ्या ड्रायफ्रूटसह फळांवरही व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला असून, त्यामुळे बाजारातून हे उत्पादन गायब होते आहे. आता नाशिकच्या बाजारात केवल टर्कीमधील सफरचंद दिसत असून, त्याचे प्रमाणही अवघे ५ टक्के इतके असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

काय होईल परिणाम...
तुर्कीच्या उत्पादनाला भारत ही मोठी बाजारपेठ आहे. तुकींमधून भारतात सर्वाधिक सफरचंद आयात होतात. याशिवाय पीच आणि पेरचीही आयात केली जाते. मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. त्याची किंमतही भारतातील सफरचंदाच्या सरासरीइतकी असते. प्रमुख पुरवठादारांमध्ये इराण, तुकीं आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. तुर्कीचे सफरचंद कमी आल्यास देशातील सफरचंदाचे भाव वाढू शकतात, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे.

तुर्कस्तान, अझरबैजान देशांच्या बहिष्कारासंदर्भात व्यापाऱ्यांची बैठक
तुर्कस्तान व अझरबैजान या देशांचा बहिष्कार व त्यांच्याशी व्यापार, उद्योग न करण्यासाठी नाशिकमधील सर्व व्यापारी, औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र चेंबरच्या विभागीय शाखा कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. पाकिस्तानला खुला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तान व अझरबैजान या देशांनी घेतलेली भूमिका भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने व आंतरराष्ट्रीय शांततेच्या विरोधात आहे. सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, प्रतिनिधीनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

तुर्कीमधून जास्त प्रमाणात ड्रायफ्रूटची आयात होत नाही. केवळ कॅप्रीकॉटची आयात केली जाते. तेही आता बंद झाले आहे. नवीन ड्रायफ्रूट कोणी मागवत नसल्याने पुरवठा ठप्प झाला आहे. भविष्यात तो होण्याची शक्यता नाही. 
- कमलेश भीमजियाणी, नीलेश ड्रायफ्रूट

भारतात तुर्कीमधून पेर, पीच आणि ड्रायफ्रूटची आयात केली जाते. त्यातही सफरचंदाची आयात मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु आता तुर्कीमधून येणारी सफरचंद बंद झाली असून, त्याला पर्यायी मार्ग वापरला जातो आहे. तुर्कीची भारतातील निर्यात किमान ५०० कोटी रुपयांची असेल. मात्र, या सगळ्या उलाढालीने पर्यटनासह निर्यातबंदीचा फटका आता तुर्कीला बसेल.
- सूरज भागवत, फळविक्रेता

Web Title: Latest News india pak issue Fruits from Turkey disappear from market after tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.