Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > बांगलादेशातून येणाऱ्या वस्तूंच्या लँड रूट आयातीवर निर्बंध, कांद्यावर काय परिणाम होईल? 

बांगलादेशातून येणाऱ्या वस्तूंच्या लँड रूट आयातीवर निर्बंध, कांद्यावर काय परिणाम होईल? 

Latest News India imposes land and sea port restrictions on jute from Bangladesh | बांगलादेशातून येणाऱ्या वस्तूंच्या लँड रूट आयातीवर निर्बंध, कांद्यावर काय परिणाम होईल? 

बांगलादेशातून येणाऱ्या वस्तूंच्या लँड रूट आयातीवर निर्बंध, कांद्यावर काय परिणाम होईल? 

Agriculture News : यानुसार जमिनीमार्गे (लँड रूट) आयातीवर तातडीने बंदी घातली आहे. याबाबतची अधिसूचना परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने जारी केली.

Agriculture News : यानुसार जमिनीमार्गे (लँड रूट) आयातीवर तातडीने बंदी घातली आहे. याबाबतची अधिसूचना परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने जारी केली.

Agriculture News :  भारत सरकारने बांगलादेशमधून जूट, विणकामाचे वस्त्र, जूटचे धागे (यार्न) यांसारख्या वस्तूंच्या जमिनीमार्गे (लँड रूट) आयातीवर तातडीने बंदी घातली आहे. या वस्तू आता फक्त न्हावा शेवा बंदर (Nhava Sheva Port) इथूनच भारतात येऊ शकतील. 

काही दिवसांपूर्वी बांगलादेशातून कापड निर्यातीवर जमिनीवरील बंदरांवर निर्बंध लादले होते. यानुसार जमिनीमार्गे (लँड रूट) आयातीवर तातडीने बंदी घातली आहे. याबाबतची अधिसूचना परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने जारी केली. ज्यामध्ये मुंबईतील न्हावा शेवा बंदर वगळता "सर्व जमिनी आणि सागरी बंदरांवर" हे निर्बंध लागू होतील, असे सांगण्यात आले.

नेमकी कशावर बंदी घातली आहे? 
तर यामध्ये जूटचे धागे (Jute Yarn), विणलेले जूट कापड, जूटचे अनब्लिचड (रसायनशिवाय तयार केलेले) वस्त्र, तसेच इतर जूटसंबंधी वस्त्र साहित्य. 

कांदा निर्यातीच काय? 
महत्वाचे म्हणजे या आदेशात कांदा निर्याती संदर्भात कुठलाही उल्लेख नाही. ही बंदी केवळ जूट वस्तूंवर आहे, कांद्यावर नाही. जूटसंबंधी माल बंद झाल्यामुळे इतर व्यापारावर थोडा ताण येईल, पण कांद्याच्या किंमतीवर त्वरित परिणाम होण्याची शक्यता नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून भारताकडून होणारी कांदा निर्यात बंद आहे. बांग्लादेशातील स्थानिक कांदा उत्पादन चांगले झाले असल्याने अजूनही हा कांदा बाजारात आहे. मात्र पुढील काही दिवसांत ही भारतीय कांद्याची निर्यात सुरु होईल, अशी शक्यता आहे.
-विकास सिंग, कांदा निर्यातदार, नाशिक

Web Title: Latest News India imposes land and sea port restrictions on jute from Bangladesh