हिंगोली : मराठवाड्यातील प्रमुख हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोलीत यंदा हळद उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.(Hingoli APMC)
आधीच बाजारभावात मोठी घसरण झाली असताना, त्यात भर म्हणून अवकाळी पावसामुळे बाजारात आणलेली हळद भिजल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.(Hingoli APMC)
या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत आंदोलन छेडत लिलाव प्रक्रिया काही काळ बंद पाडली.(Hingoli APMC)
शेतकऱ्यांच्या मते, बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र बाजारात मिळणारे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.(Hingoli APMC)
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
* हळदीला हमीभावासारखा योग्य दर मिळावा
* लिलाव प्रक्रिया तातडीने आणि पारदर्शक व्हावी
* बाजार समितीत पावसापासून संरक्षणासाठी शेड उभारावेत
* वजनकाट्यांची संख्या वाढवावी
* भिजलेल्या हळदीसाठी विशेष दर जाहीर करावेत
शेतकरी का संतप्त?
* बाजारात हळदीचे दर घसरले
* उत्पादन खर्चात मोठी वाढ
* अवकाळी पावसामुळे हळद भिजली
* माल खराब होण्याची भीती
* व्यापाऱ्यांकडून कमी दर दिल्याचा आरोप
बाजारातील सध्याची परिस्थिती
* बाजार समितीत मोठ्या प्रमाणात हळदीची आवक
* भिजलेल्या हळदीमुळे गुणवत्ता घसरली
* व्यापारी कमी दराने खरेदी करत असल्याची तक्रार
* शेतकरी संघटनांचा आंदोलनाचा इशारा
हे ही वाचा सविस्तर : Halad Market Hingoli : अवकाळीचा घाला! हळदीसोबत शेतकऱ्यांची आशाही वाहून गेली
अधिक वाचा : Wheat Market : अवकाळी पावसाचा गव्हाला मोठा फटका; बाजारात रंगहीन गव्हाची आवक
