Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > हमीभावाने हरभरा खरेदी; नाशिक जिल्ह्यात कुठे-कुठे खरेदी केंद्र, वाचा संपूर्ण यादी 

हमीभावाने हरभरा खरेदी; नाशिक जिल्ह्यात कुठे-कुठे खरेदी केंद्र, वाचा संपूर्ण यादी 

Latest news Harbhara Kharedi Where are the purchase centers in Nashik district, read the complete list | हमीभावाने हरभरा खरेदी; नाशिक जिल्ह्यात कुठे-कुठे खरेदी केंद्र, वाचा संपूर्ण यादी 

हमीभावाने हरभरा खरेदी; नाशिक जिल्ह्यात कुठे-कुठे खरेदी केंद्र, वाचा संपूर्ण यादी 

Harbhara Kharedi : चना खरेदीसाठी आधारभूत दर रूपये ५ हजार ६५० प्रति क्विंटल असा निश्चित केला आहे. 

Harbhara Kharedi : चना खरेदीसाठी आधारभूत दर रूपये ५ हजार ६५० प्रति क्विंटल असा निश्चित केला आहे. 

नाशिक : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार NCCF मार्फत चना खरेदीसाठी आधारभूत दर रूपये ५ हजार ६५० प्रति क्विंटल असा निश्चित केला आहे. 

शेतकऱ्यांनी आधारभूत दरानुसार चना खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

शेतकऱ्यांनी चना विक्रीकरिता आपल्या गावाजवळील NCCF च्या खरेदी केंद्रावर जावून सातबारा उतारा( ऑनलाइन‍ पिकपेरा असलेला), आधार कार्ड, बँकेचे पासबुक सोबत नेवून नोंदणी करावी. सदर नोंदणी ही POS मशीनने करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक कागदत्रांसह प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. 

खरेदीकरिता मोबाइलवर एस.एम.एस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी केंद्रावर घेवून यायचे आहे. जिल्ह्यात आधारभूत दराने चना खरेदीसाठी ५ खरेदी केंद्रांना शेतकरी नोंदणीसाठी NCCF कडून मान्यता देण्यात आली आहे.

असे आहेत मंजूर खरेदी केंद्र, अधिकारी व संपर्क क्रमांक
1.येवला -  येवला तालुका सह. खरेदी विक्री संघ, बाबासाहेब  जाधव- 9423176349
2.मालेगाव - शेतकरी सह. संघ,लि.मालेगाव, पांडूरंग बच्छाव-8999469990
3.देवळा - देवळा ता.सह.ख.वि.संघ लि. देवळा, गौरव आहेर-9767579614
4.निफाड - कृषीसाधना म.फळे व भाजी. सह. संस्था लि. विंचूर, गौरव जाधव- 7038505386
5.सिन्नर - सिन्नर तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. सिन्नर, दत्तात्रय राजेभोसले- 9767602852

 

नाफेडद्वारा हरभऱ्याची नोंदणी व खरेदी, नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील?

 

Web Title : समर्थन मूल्य पर चना खरीद: नासिक जिले के केंद्र सूची

Web Summary : नासिक जिले के किसान एनसीसीएफ के माध्यम से 5,650 रुपये प्रति क्विंटल के समर्थन मूल्य पर चना बेचने के लिए 31 मार्च, 2026 तक पंजीकरण करा सकते हैं। पंजीकरण के लिए येवला, मालेगांव, देवला, निफाड़ और सिन्नर के निर्दिष्ट केंद्रों पर विशिष्ट दस्तावेजों की आवश्यकता है। किसानों को एसएमएस के माध्यम से सूचित किया जाएगा कि अपनी उपज कब लानी है।

Web Title : Gram Procurement at Support Price: Nashik District Center List

Web Summary : Farmers in Nashik district can register until March 31, 2026, to sell gram at the support price of ₹5,650 per quintal through NCCF. Registration requires specific documents at designated centers in Yeola, Malegaon, Deola, Niphad, and Sinnar. SMS will notify farmers when to bring their produce.