Lokmat Agro >बाजारहाट > Halad Vayde Bajar : हळदीच्या वायदे बाजाराला बंदी घातली तर... फ्युचर रेट कळतील का? 

Halad Vayde Bajar : हळदीच्या वायदे बाजाराला बंदी घातली तर... फ्युचर रेट कळतील का? 

Latest News halad vayde bajar Traders demand ban on turmeric futures market | Halad Vayde Bajar : हळदीच्या वायदे बाजाराला बंदी घातली तर... फ्युचर रेट कळतील का? 

Halad Vayde Bajar : हळदीच्या वायदे बाजाराला बंदी घातली तर... फ्युचर रेट कळतील का? 

Halad Vayde Bajar : निझामाबाद येथील हळद भेसळ प्रकरणात काही व्यापाऱ्यांनी हळदीचे वायदे बंद करण्याची मागणी केली आहे.

Halad Vayde Bajar : निझामाबाद येथील हळद भेसळ प्रकरणात काही व्यापाऱ्यांनी हळदीचे वायदे बंद करण्याची मागणी केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- सुनील चरपे

नागपूर : वायदे बाजारातील ‘एनसीडीईएक्स’च्या निझामाबाद येथील हळद भेसळ प्रकरणात काही व्यापाऱ्यांनी हळदीचे वायदे बंद करण्याची मागणी केली आहे. वायदे बंद केल्यास हळदीची मूल्य पडताळणी (प्राइस डिस्कव्हरी) संपुष्टात येणार आहे. भविष्यातील दर (फ्यूचर रेट) कळणार नसल्याने शेतकरीदेखील संकटात सापडणार असल्याने हळदीला वायदे बाजाराचे कवच असणे अनिवार्य आहे.

एनसीडीईएक्सच्या प्राइस ॲडव्हायझरी कमिटीच्या सदस्यांनी नुकतीच निझामाबाद येथील त्यांच्या गाेदामात व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या हळदीची तपासणी केली. काही पाेत्यांमधील हळदीत भेसळ झाल्याचे निदर्शनास येताच त्यांची तातडीचे चाैकशी सुरू केली. सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी याचे भांडवल करीत हळदीच्या वायद्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. 

या मागणीला शेतकरी उत्पादक कंपन्या व हळद उत्पादकांसाेबत गुंतवणूकदार व अनेक व्यापाऱ्यांनी विराेध दर्शविला असून, वायदे सुरू ठेवण्याची मागणी रेटून धरली आहे. सध्या एकूण उत्पादनाच्या पाच ते सात टक्के हळद शेतकऱ्यांकडे शिल्लक असून, किमान ९० टक्के हळद व्यापाऱ्यांकडे आहे. त्यांनी ती १० ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करून गाेदामांमध्ये ठेवली आहे. चांगला दर मिळाल्याने यावर्षी महाराष्ट्रासाेबतच देशात हळदीचे पेरणी क्षेत्र वाढल्याने उत्पादनही वाढणार आहे.
...
कुणाचे नुकसान, कुणाचा फायदा?
वायद्यांवर बंदी घातल्यास हळदीची प्राइस डिस्कव्हरी संपुष्टात येऊन शेतकरी, गुंतवणूकदार, प्रक्रियादार, इतर व्यापारी व निर्यातदारांना फ्यूचर रेट कळणार नाही. त्यांना दराबाबत अंदाज बांधणे कठीण जाईल. ते त्यांचे दरावरील नियंत्रण गमावणार असल्याने या सर्वांचे माेठे आर्थिक नुकसान हाेणार आहे. माेजकेच व्यापारी हळदीचे दर नियंत्रणात ठेवतील. ते शेतकऱ्यांकडून कमी दरात हळद खरेदी करीत प्रक्रियादारांना चढ्या दराने विकणार असल्याने त्यांचा माेठा आर्थिक फायदा हाेणार आहे.

एप्रिलचे दर ऑक्टाेबरमध्ये
मे २०२५ मध्ये सुरू झालेले वायद्यांची मुदत २० ऑगस्ट २०२५ ला संपली आहे. १ ऑक्टाेबर २०२५ ला एप्रिल २०२६ चे वायदे सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच एप्रिल २०२६ मधील हळदीचे दर ऑक्टाेबर २०२५ मध्येच कळणार आहेत. ते वायदे खुले करू नका, अशी मागणी हे व्यापारी करीत असल्याने ते इतरांचा दर निर्णय अधिकार हिरावून घेत आहेत.

सात शेतमालावर बंदी
तुरीच्या वायद्यांवर मागील १४ वर्षांपासून बंदी घातली आहे. २० डिसेंबर २०२१ पासून साेयाबीन व साेया काॅम्प्लेक्स, माेहरी व माेहरी काॅम्प्लेक्स त्यानंतर हरभरा, गहू, मूग, बिगर बासमती तांदूळ व कच्च्या पामतेलाच्या वायद्यांवर ३१ मार्च २०२६ पर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे या शेतमालाचे दर वर्षभर दबावात राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: Latest News halad vayde bajar Traders demand ban on turmeric futures market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.