Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Halad Market : हिंगोलीत हळदीचा पूर! मोजमापाला २ दिवस, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Halad Market : हिंगोलीत हळदीचा पूर! मोजमापाला २ दिवस, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

latest news Halad Market: Turmeric flood in Hingoli! 2 days to measure, administration takes big decision | Halad Market : हिंगोलीत हळदीचा पूर! मोजमापाला २ दिवस, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Halad Market : हिंगोलीत हळदीचा पूर! मोजमापाला २ दिवस, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Halad Market : हिंगोली येथील हळद मार्केट यार्डात आवक प्रचंड वाढल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. मोजमापासाठी दोन-दोन दिवस लागत असल्याने प्रशासनाने बीट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.(Halad Market)

Halad Market : हिंगोली येथील हळद मार्केट यार्डात आवक प्रचंड वाढल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. मोजमापासाठी दोन-दोन दिवस लागत असल्याने प्रशासनाने बीट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.(Halad Market)

Halad Market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात सध्या हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने व्यवस्थापनावर ताण निर्माण झाला आहे.(Halad Market)

दररोज ३ ते ४ हजार क्विंटल हळद बाजारात दाखल होत असून, मोजमाप प्रक्रियेला दोन-दोन दिवस लागत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना मार्केट यार्डात मुक्काम ठोकावा लागत असून मोठी गैरसोय होत आहे.(Halad Market)

या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत शनिवारपासून पुढील सूचनेपर्यंत हळदीचे बीट बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.(Halad Market)

आवक वाढली, व्यवस्थापनावर ताण

हिंगोलीसह परजिल्ह्यातील अनेक शेतकरी हळद विक्रीसाठी येथे येतात. सध्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

मार्केट यार्ड परिसरात तसेच बाहेरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, संपूर्ण यंत्रणेवर ताण आला आहे.

मोजमापासाठी दोन दिवसांचा विलंब

सध्या उपलब्ध यंत्रणा आणि मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने एका दिवसात सर्व हळदीचे मोजमाप करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन दिवसांपर्यंत थांबावे लागत आहे. मुक्काम, अन्न व इतर सुविधांअभावी शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

बीट बंद ठेवण्याचा निर्णय

गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणि आधीपासून आलेल्या हळदीचे व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तात्पुरता निर्णय घेतला आहे. 

शनिवार-रविवारी बंद ठेवल्यानंतर आता सोमवारपासून पुढील आदेश येईपर्यंत नवीन हळद स्वीकारली जाणार नाही.

आधी आलेल्या वाहनांना दिलासा

मार्केट यार्डात आधीपासून उभ्या असलेल्या वाहनांमधील हळदीचे बीट आणि मोजमाप नियमितपणे केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आधी आलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सूचना

प्रशासनाने शेतकऱ्यांना सध्या हळद मार्केट यार्डात आणू नये, असे आवाहन केले आहे. पुढील सूचनेनंतरच विक्रीसाठी हळद आणावी, असे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळद बाजारात तेजीची चाहूल;'या' महिन्यांत दर वाढणार?

अधिक वाचा : Halad Kocha Demand : वसमत बनतंय 'कोचा हब'! दक्षिण भारतातून तुफान मागणी; कारण ऐकून थक्क व्हाल

Web Title : हिंगोली हल्दी बाजार में भारी भीड़; अधिक आवक के कारण व्यापार निलंबित

Web Summary : हिंगोली हल्दी बाजार में आवक बढ़ने से दबाव है, जिससे देरी हो रही है। बाजार यार्ड ने बैकलॉग को प्रबंधित करने और सुचारू संचालन सुनिश्चित करने के लिए अस्थायी रूप से व्यापार निलंबित कर दिया है। किसानों को अगली सूचना तक हल्दी लाने से बचने की सलाह दी जाती है।

Web Title : Hingoli Turmeric Market Overwhelmed; Trading Suspended Due to High Volume

Web Summary : Hingoli's turmeric market faces strain due to a surge in arrivals, causing delays. The market yard has temporarily suspended trading to manage the backlog and ensure smooth operations. Farmers are advised to postpone bringing turmeric until further notice.