Halad Market : मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) संत नामदेव मार्केट यार्डात हळदीला उतरती कळा लागली आहे. आठवडाभरात क्विंटलमागे पाचशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. (Halad Market)
हिंगोली येथील मार्केट यार्डात गतवर्षी हळदीला सरासरी १४ ते १५ हजार रुपयांचा दर मिळाला होता. यंदाही हळदीला समाधानकारक भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. (Halad Market)
यंदा मात्र गतवर्षीच्या तुलनेत क्विंटलमागे दोन ते अडीच हजार रूपयांनी भाव कमी मिळत आहे. मार्च, एप्रिलमध्ये सरासरी १२ हजार ५०० ते १३ हजार रूपये भाव मिळाला. जून उजाडताच मात्र भावात घसरण झाली, ती अजूनही कायम आहे. (Halad Market)
सध्या हळदीला सरासरी ११ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. हा भाव मागील आठवड्याच्या तुलनेत पाचशे रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. (Halad Market)
हळदीला काही महिन्यांपूर्वी १३ हजारांहून अधिक दर मिळत होता, तीच हळद आता ११ हजार ७०० रुपये दराने विकली जात आहे. हिंगोली बाजारात आठवडाभरात ५०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकरी माल विक्रीपासून दूर आहेत, पण व्यापारीही सध्या भाववाढीबाबत अनिश्चित आहेत. त्यामुळे 'विकावी की थांबावी?' या चिंतेत हळद उत्पादक अडकले आहेत.
हळद उत्पादकांना भाववाढीची प्रतीक्षा
जिल्ह्यातील अनेक हळद उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत हळद विक्री केलेली नाही. आज-उद्या भाव वाढतील आणि फायदा होईल, अशी आशा आहे. मात्र, भाववाढीची शाश्वती सध्या व्यापारीही देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हळद विक्री करावी की भाववाढीची प्रतीक्षा करावी, अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी सापडला आहे.
हळदीची आवक मंदावली
मागील आठवड्यात दोन ते अडीच हजार क्विंटल हळदीची आवक होत होती. दोन दिवसांपासून मात्र आवक मंदावली असून, १९ जूनला केवळ एक हजार ४८० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. १० हजार ७०० ते जास्तीत जास्त १२ हजार ८०० रुपयांदरम्यान भाव मिळाला, तर सरासरी ११ हजार ७५० रुपये भाव राहिला.
हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : अकोला, अमरावतीत उच्चांकी दर; काही बाजारात घसरण वाचा सविस्तर