Halad Market : खरीप हंगामात घेतलेल्या हळदीला वाशिमसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उच्च दर मिळत आहेत. प्रतिक्विंटल ९ हजार ८०० ते ११ हजार ३५० रुपये इतका उच्चांक गाठल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचा वातावरण आहे. (Halad Market)
मागील काही आठवड्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या दरामुळे हळदी उत्पादकांना मोठा फायदा होत आहे, तर पुढील काळात हळदीच्या दरात आणखी वाढ होण्याचे संकेतही दिसून येत आहेत.(Halad Market)
गेल्या काही आठवड्यांपासून हळदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. राज्यासह दक्षिण भारतातील मसाला बाजारपेठेत हळदीची मागणी वाढल्यामुळे बाजारभावाला बळ मिळाले आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.(Halad Market)
६,८०० क्विंटलची आवक
१९ सप्टेंबर रोजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कान्डी आणि गट्ट या दोन्ही प्रकारांच्या हळदीची तब्बल ६ हजार ८०० क्विंटल आवक झाली. आवक जरी मोठी असली तरी उच्च दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हळदीच्या दरात आणखी वाढ होण्याचे संकेत
वाशिम, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड, कारंजा आणि मानोरा या बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया वेगात सुरू आहे. बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे की, मागणी अधिक असल्याने पुढील काळात हळदीच्या दरात अजून वाढ होऊ शकते.
शेतकऱ्यांसाठी हा हंगाम सध्या लाभदायक ठरत आहे, कारण मागील हंगामात कमी भावामुळे अनेक शेतकरी आर्थिक दबावाखाली होते.
हळदीच्या या वाढत्या दरामुळे शेतकरी त्यांच्या उत्पन्नात सुधारणा करू शकतील आणि साठवलेल्या हळदीला उच्च बाजारभाव मिळेल.