हिंगोली : हळदीला 'एनसीडीएक्स'च्या (NCDX) वायदा बाजारातून वगळावे, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी २२ ऑगस्टपासून हळदीचा लिलाव बंद ठेवला आहे. सलग दहा दिवसांपासून संत नामदेव मार्केट यार्डात लिलाव न झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. (Halad Market)
अलीकडच्या काळात हळदीचे भाव चढ-उतार अनुभवत आहेत. कधी चांगला दर मिळतो, तर कधी पडत्या भावात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. त्यामुळे वायदा बाजाराचा परिणाम थेट शेतकरी व व्यापाऱ्यांवर होत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर 'एनसीडीएक्स'चे सीईओ यांच्याकडे हळदीला वायदा बाजारातून वगळण्याची मागणी नोंदवली आहे. (Halad Market)
शेतकऱ्यांना मोठा फटका
लिलाव बंद असल्याने आर्थिक गरज असलेल्या शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दराने हळद विकावी लागते, त्यामुळे त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. दुसरीकडे खुल्या बाजारातील खरेदीदारांना मात्र या काळात कमी दरात माल खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.
२ सप्टेंबरपासून व्यवहार सुरू
व्यापाऱ्यांनी २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे २ सप्टेंबरपासून हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात लिलाव पूर्ववत सुरू होणार आहे. दहा दिवसांच्या या बंदमुळे हळदीचा बाजार कोलमडला असला तरी पुढील काळात स्थैर्य येण्याची अपेक्षा आहे.
हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळद विकायची कुणाला? व्यापाऱ्यांचा बेमुदत संप सुरू वाचा सविस्तर