Lokmat Agro >बाजारहाट > Groundnut Market : भुईमुगाच्या आवकेत मोठी घसरण; जाणून घ्या कसा मिळतोय दर

Groundnut Market : भुईमुगाच्या आवकेत मोठी घसरण; जाणून घ्या कसा मिळतोय दर

latest news Groundnut Market: Big drop in groundnut arrivals; Know how the price is being obtained | Groundnut Market : भुईमुगाच्या आवकेत मोठी घसरण; जाणून घ्या कसा मिळतोय दर

Groundnut Market : भुईमुगाच्या आवकेत मोठी घसरण; जाणून घ्या कसा मिळतोय दर

Groundnut Market : बाजार समितीत सध्या शेतमालाच्या दरात घसरणीचे सावट आहे. भुईमुग, तूर आणि हळद यासारख्या प्रमुख पिकांचे दर समाधानकारक राहिलेले नाहीत. (Groundnut Market)

Groundnut Market : बाजार समितीत सध्या शेतमालाच्या दरात घसरणीचे सावट आहे. भुईमुग, तूर आणि हळद यासारख्या प्रमुख पिकांचे दर समाधानकारक राहिलेले नाहीत. (Groundnut Market)

शेअर :

Join us
Join usNext

Groundnut Market :   बाजार समितीत सध्या शेतमालाच्या दरात घसरणीचे सावट आहे. भुईमुग, तूर आणि हळद यासारख्या प्रमुख पिकांचे दर समाधानकारक राहिलेले नाहीत. (Groundnut Market)

भुईमुगात तब्बल ५०० रुपयांची घसरण झाली असून, तुरीचा दरही मागील वर्षाच्या तुलनेत निम्म्याने खाली आला आहे. हळद उत्पादकही दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत खरीप हंगामपूर्वी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Groundnut Market)

हिंगोली येथील मोंढा बाजार समितीत खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर असतानाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतमालासाठी समाधानकारक दर मिळेनासे झाले आहेत.  (Groundnut Market)

विशेषतः भुईमुगाच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी नाराज आहेत. मागील चार दिवसांत भुईमुगाच्या भावात तब्बल ५०० रुपयांची घट झाली आहे. त्याच वेळी, तुरीचाही उत्साह ओसरताना दिसतोय.  (Groundnut Market)

भुईमुगाच्या दरात मोठी घसरण, आवकही मंदावली

मे महिन्यात मोंढा बाजार समितीत दररोज सरासरी ८०० ते १ हजार क्विंटल भुईमुगाची आवक नोंदवली जात होती. त्यावेळी दर ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेले होते. मात्र, जुनच्या सुरुवातीसच परिस्थिती बदलली आहे.

१२ जून रोजी फक्त १५० क्विंटलचीच आवक झाली असून, भाव ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांवर आला आहे. सरासरी भाव सध्या ४ हजार ७५० रुपये इतका आहे. भाव घसरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी माल विक्रीविना ठेवला असून, भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

तुरही गाठेना जुना पल्ला

गेल्या वर्षी ११ हजार रुपये दर गाठणारी तूर यंदा ६ हजार ते ६ हजार ३०० रुपयांच्या दरात विकली जात आहे. मोंढ्यात सरासरी ३०५ क्विंटल तुरीची आवक असून, तूर उत्पादकांच्या आशा मंदावल्या आहेत.

हळद उत्पादकही अस्वस्थ

हळदीच्या बाबतीतही यंदा मागील वर्षी मिळालेला १४ हजार  ते १५ हजार रुपयांचा दर गाठता आलेला नाही. सध्या हळदीस १० हजार ८६० ते १२ हजार ८६० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय. गुरुवारी (१२ जून) रोजी बाजारात सुमारे १ हजार २०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. मात्र, दर कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

मोंढा बाजार समितीतील १२ जूनची शेतमाल आवक व सरासरी दर

शेतमाल      आवक (क्विंटल)सरासरी दर (रु./क्विंटल)
तूर   ३०५   ६,१००
भुईमूग   १००   ४,७५०
हळद   १,२००   ११,८६०

शेतकरी चिंतेत

व्यापाऱ्यांनाही सध्या दर वाढण्याची शाश्वती देता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. अनेक शेतकरी पावसाळ्यापूर्वी खते, बियाणे खरेदीची तयारी करत असताना दरघसरणीमुळे त्यांना मोठा फटका बसू शकतो.

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तुरीच्या आवकेत चढ-उतार! आज कोणत्या बाजारात सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर

Web Title: latest news Groundnut Market: Big drop in groundnut arrivals; Know how the price is being obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.