Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Export vegetable, fruits : शेतकऱ्यांनो! फळे, भाजीपाला निर्यातीसाठी नोंदणी केली का? इथं करा नोंदणी

Export vegetable, fruits : शेतकऱ्यांनो! फळे, भाजीपाला निर्यातीसाठी नोंदणी केली का? इथं करा नोंदणी

Latest News Farmers register exportable fruit and vegetable on Hortinet system see details | Export vegetable, fruits : शेतकऱ्यांनो! फळे, भाजीपाला निर्यातीसाठी नोंदणी केली का? इथं करा नोंदणी

Export vegetable, fruits : शेतकऱ्यांनो! फळे, भाजीपाला निर्यातीसाठी नोंदणी केली का? इथं करा नोंदणी

धुळे : राज्यातून फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीला (Vegetable Export) प्रोत्साहन देण्यासाठी व आयातदार देशांच्या कीडनाशक उर्वरित अंश व ...

धुळे : राज्यातून फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीला (Vegetable Export) प्रोत्साहन देण्यासाठी व आयातदार देशांच्या कीडनाशक उर्वरित अंश व ...

धुळे : राज्यातून फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीला (Vegetable Export) प्रोत्साहन देण्यासाठी व आयातदार देशांच्या कीडनाशक उर्वरित अंश व कीड रोग मुक्ततेबाबतची हमी देण्यासाठी द्राक्षासाठी ग्रेपनेट प्रणालीवर २८ हजार ६२४, आंब्यासाठी मँगोनेट प्रणालीवर १३८, भाजीपाल्यासाठी व्हेजनेट प्रणालीवर १६५, केळीची आदर फ्रुटनेट प्रणालीवर २०१ अशी एकूण २९ हजार १९५ शेतांची नोंदणी झालेली आहे. राज्यात नाशिक विभाग (Nashik Division) निर्यातक्षम नोंदणीत प्रथम स्थानावर आहे.

फळ व भाजीपाला (Fruit Vegetable) निर्यातीस चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत (Agriculture Department) खास उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर कृषी माल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच फळे व भाजीपाला ऑनलाइन नोंदणीसाठी फार्म रजिस्ट्रेशनची मोबाइल ॲपचा (Mobile App) वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. निर्याती बरोबरच स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांना कीड व रोगमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक विभागात नाशिक ४५ हजार ०९०, धुळे ३५०, नंदुरबार ३५० व जळगाव १ हजार २०० असा एकूण ४६ हजार ९९० बागांची नोंदणीचे लक्षांक देण्यात आले आहे. द्राक्ष बागांची नोंदणी करण्यास ३१ जानेवारी २०२४ पर्यंत तर आंबा बागाची नोंदणी करण्यास ३१ डिसेंबर २०२४, आंबा बागांची नोंदणी करण्यास ३१ मार्च, २०२५ मुदत देण्यात आली आहे. तसेच इतर फळे व भाजीपाला पिकांची नोंदणी वर्षभर सुरू असते.

गतवर्षीच्या तुलनेत सद्य स्थितीत शेत नोंदणी अत्यंत अल्प झाली असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्यातक्षम पिकांची शेत नोंदणी संबंधित प्रणालीवर करावी, अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन विभागीय कृषी सहसंचालक वाघ यांनी केले आहे.

Web Title: Latest News Farmers register exportable fruit and vegetable on Hortinet system see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.