lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > रावेरच्या केळीची रेल्वेद्वारे परराज्यात निर्यात, आठवड्यात दहा हजार टन रवाना

रावेरच्या केळीची रेल्वेद्वारे परराज्यात निर्यात, आठवड्यात दहा हजार टन रवाना

Latest News Export of Raver's bananas to other states by rail, 10 thousand tonnes per week | रावेरच्या केळीची रेल्वेद्वारे परराज्यात निर्यात, आठवड्यात दहा हजार टन रवाना

रावेरच्या केळीची रेल्वेद्वारे परराज्यात निर्यात, आठवड्यात दहा हजार टन रवाना

रावेर केळी फळबागायतदार संघटनेने थेट रेल्वेद्वारे केळीची निर्यात सुरु केली आहे.

रावेर केळी फळबागायतदार संघटनेने थेट रेल्वेद्वारे केळीची निर्यात सुरु केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव : सध्या केळीच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने केळी उत्पादकांना अपेक्षित भाव नसल्याने चितेंत आहे. अशात रावेर केळी  फळबागायतदार संघटनेने थेट रेल्वेद्वारे केळीची निर्यात सुरु केली आहे. आठवड्यातून दोन दिवस केळी रेकद्वारा परराज्यांमध्ये आता रवाना होणार आहे. यामुळे केळीच्या घसरणाऱ्या दरास लगाम बसेल, अशी आशा पल्लवित झाली आहे.

तापमानामुळे केळी मालाची वाढ़ती उपलब्धता व दुसरीकडे बाजारात आंबा, टरबूज, खरबूज आदी उन्हाळी फळांनी उभी केलेली स्पर्धा पएप्ता केळीची मागणी घटली आहे. हे पाहता बाजारभाव घसरू नये, यासाठी रावेर रेल्वे स्टेशन केळी फळबागायतदार संस्थेने केळी व्हीपीयू २३ टन क्षमतेच्या २२ बोगीच्या रेकने दिल्लीच्या नया बाजारात एकाचवेळी पाच केळी रवाना केली आहे. यामुळे बाजारभावात स्थिरता होण्यास मदत होणार आहे. तालुकाभरातून रोज किमान 375 ट्रक केळी रवाना होत असताना युनियनने आठवड्यातून 375 केळी किमान दोन दिवस रेकद्वारे 10 हजार टन केळी रवाना करण्यास सुरुवात केली आहे. 


 ५० टक्के सवलतीचे अनुदान पूर्ववत करा

भारतीय रेल्वे प्रशासनाकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे देण्यात येणारे भाड्यातील ५० टक्के सवलतीचे अनुदान पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

केळीचा बाजारभाव कोसळू नये, यामुळे भारतीय रेल्वे प्रशासनाने रेल्वे भाड्यातील सवलतीच्या अनुदानाबाबत ठेंगा दाखवला असला तरी शेतकरी हितासाठी आठवड्यात दहा हजार टन केळी रवाना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने यासंबंधी गांभीयनि दखल घेऊन भाडे सवलतीचे ५० टक्के अनुदान पूर्ववत दिल्यास रेल्वे रेकद्वारे बारमाही केळीची वाहतूक सुरू करू.
- रामदास पाटील, अध्यक्ष, रावेर रेल्वे स्टेशन केळी फळबागायतदार संस्था.

तापमान वाढले असून उन्हाळी फळांची बाजारात उपलब्धता असल्याने केळीची मागणी घटली आहे. त्यामुळे केळी भावात घसरण झाली आहे. बाजारभाव घसरल्यास फायदा कुणाचाच नसतो, तेजीत मात्र सर्वांचाच फायदा होतो.

डी. के. महाजन, प्रगतशील शेतकरी, वाघोदा बु

Web Title: Latest News Export of Raver's bananas to other states by rail, 10 thousand tonnes per week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.