Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Drumstick Market : शेतकऱ्यांच्या शेवग्याला मागणी; कमी आवकेतही दर उसळले वाचा सविस्तर

Drumstick Market : शेतकऱ्यांच्या शेवग्याला मागणी; कमी आवकेतही दर उसळले वाचा सविस्तर

latest news Drumstick Market: Demand for farmers' last remaining; Prices soar despite low arrivals Read in detail | Drumstick Market : शेतकऱ्यांच्या शेवग्याला मागणी; कमी आवकेतही दर उसळले वाचा सविस्तर

Drumstick Market : शेतकऱ्यांच्या शेवग्याला मागणी; कमी आवकेतही दर उसळले वाचा सविस्तर

Drumstick Market : राज्यात सध्या बहुतांश भाज्यांचे दर कमी असले तरी शेवग्याने शेतकऱ्यांची बाजू मजबूत केली आहे. मर्यादित आवक आणि दर्जेदार मालाला मागणी असल्याने शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. (Drumstick Market)

Drumstick Market : राज्यात सध्या बहुतांश भाज्यांचे दर कमी असले तरी शेवग्याने शेतकऱ्यांची बाजू मजबूत केली आहे. मर्यादित आवक आणि दर्जेदार मालाला मागणी असल्याने शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. (Drumstick Market)

Drumstick Market : भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक (Drumstick Arrivals) झाल्याने सध्या बाजारात टमाटा, वांगी, भेंडी, दोडका यांसह बहुतांश भाज्यांचे दर लक्षणीयरीत्या घसरले आहेत.(Drumstick Market)

मात्र, याच काळात शेवग्याचे दर मात्र गगनाला भिडले असून सामान्य ग्राहकांचा खिसा रिकामा होताना दिसत आहे. सध्या किरकोळ बाजारात ४० रुपयांत केवळ एक पाव शेवगा मिळत असल्याचे चित्र आहे.(Drumstick Market)

भाजीपाला स्वस्त, शेवगा मात्र महाग का?

स्थानिक उत्पादनासह बाहेरील तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजारात दाखल होत असल्याने इतर भाज्यांचे दर घसरले आहेत.

मात्र, शेवग्याची आवक मर्यादित राहिल्यामुळे त्याचे दर वाढले आहेत. थंडी ओसरल्यानंतर काही भागांत शेवग्याच्या फुलोऱ्यावर परिणाम झाल्याने उत्पादन घटले असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होत आहे.

शेवग्याची आवक किती?

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये शेवग्याची आवक अत्यल्प असल्याचे चित्र आहे. बहुतांश ठिकाणी केवळ १ ते १५ क्विंटल इतकीच आवक नोंदवली गेली आहे.

छत्रपती संभाजीनगर : १५ क्विंटल

पुणे : ७२ क्विंटल (सर्वाधिक)

मुंबई : ३४ क्विंटल

खेड–चाकण : ६ क्विंटल

सातारा : ४ क्विंटल

श्रीरामपूर, भुसावळ, राहता : प्रत्येकी १–२ क्विंटल

बाजारनिहाय दर (प्रति क्विंटल)

खेड–चाकण : ८,००० ते १२,००० रुपये (सरासरी १०,०००)

श्रीरामपूर : ८,००० ते १०,००० रुपये

सातारा : ८,००० ते १०,००० रुपये

मुंबई : ८,००० ते १०,००० रुपये

पुणे : ३,००० ते १०,००० रुपये (सरासरी ६,५००)

छत्रपती संभाजीनगर : सरासरी ६,००० रुपये

अकलुज : ३,००० ते ५,८०० रुपये

उच्च प्रतीचा, लांब व कोवळा शेवगा असलेल्या मालाला उच्चांकी दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

किरकोळ बाजारात ग्राहकांची कोंडी

घाऊक बाजारातील दरवाढीचा फटका थेट किरकोळ बाजारात बसत आहे. सध्या शहर व ग्रामीण भागात शेवग्याचे दर १४० ते १६० रुपये किलो दरम्यान पोहोचले असून, अनेक ग्राहक शेवगा खरेदी टाळताना दिसत आहेत.

दरवाढीची प्रमुख कारणे

शेवग्याची आवक मर्यादित

काही भागांत उत्पादन घट

लग्नसराई व हॉटेल उद्योगातून वाढलेली मागणी

दर्जेदार शेवग्याला जास्त भाव

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीनचे दर 'या' बाजारात उसळले वाचा सविस्तर बातमी

Web Title : कम आपूर्ति, उच्च मांग के बीच सहजन की कीमतें बढ़ीं: विवरण यहाँ

Web Summary : सब्जियों की कीमतें गिरने के बावजूद, सीमित आपूर्ति और शादियों व रेस्तरां से बढ़ती मांग के कारण सहजन की कीमतें बढ़ रही हैं। खुदरा कीमतें ₹140-₹160 प्रति किलो तक पहुंच गई हैं। प्रमुख बाजारों में कम आवक दर्ज की गई, जिससे उपभोक्ताओं के लिए सामर्थ्य प्रभावित हो रही है।

Web Title : Drumstick Prices Soar Amidst Low Supply, High Demand: Details Here

Web Summary : While vegetable prices fall, drumstick prices surge due to limited supply and increased demand from weddings and restaurants. Retail prices reach ₹140-₹160 per kg. Key markets report low arrivals, impacting affordability for consumers.