lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > ताडफळ विक्रीतून अनेकांना रोजगार, बाजारात मागणी वाढली, कसा आहे भाव?

ताडफळ विक्रीतून अनेकांना रोजगार, बाजारात मागणी वाढली, कसा आहे भाव?

Latest News demand for palm has increased in market what is price | ताडफळ विक्रीतून अनेकांना रोजगार, बाजारात मागणी वाढली, कसा आहे भाव?

ताडफळ विक्रीतून अनेकांना रोजगार, बाजारात मागणी वाढली, कसा आहे भाव?

ताडफळ हे गारवा देणारे असून आरोग्यदायी असल्याने ताडफळाला मागणी वाढली आहे.

ताडफळ हे गारवा देणारे असून आरोग्यदायी असल्याने ताडफळाला मागणी वाढली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतशिवारात तसेच बोडीच्या व तलाव पाळीवर उंच उंच ताडवृक्ष दिसून येतात. साधारणतः एप्रिल महिन्यात ताडफळ लागवड असते. या कालावधीत उन्हाळा असतो. त्यामुळे ताडफळ खाण्याची इच्छा निर्माण होत असते. सध्या ताड प्रति नग ३० रूपये भावाने विकले जात असून यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष ताडफळ हे गारवा देणारे असून शरीरातील उष्णता कमी करते. ताड आरोग्यदायी असल्याने ताडाला मागणी वाढली आहे.

ठाणे व रत्नागिरी, गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात ताडाची लागवड केली जाते. त्याला ताडगोळा वृक्ष असेही म्हणतात. ताड हा वृक्ष सुमारे ३० मीटर उंच वाढतो. खोडाचा घेर तळाशी २ मीटर असून तो राखाडी व दंडगोलाकार असतो. खोड मध्यभागी किंचित फुगीर असते. खोडाच्या जमिनीलगत असलेली अनेक फुगीर मुळे खोडाला घट्ट धरून ठेवतात. खोड लहानपणी वाळलेल्या पानांनी आच्छादलेले असते. तर मोठेपणी त्यावर पडून गेलेल्या पानांचे वण (किण) दिसतात. 

दरम्यान सुरुवातीला ताडाची वाढ सावकाश होते. तर वय झाल्यावर ते भरभर वाढते. खोडाच्या टोकाला ३० ते ४० पानांचा झुबका असतो. पाने एकाआड एक, विभाजित व पंख्याच्या आकाराची असतात. पाते अर्धवर्तुळाकार १-१.५ मीटर रुंद, चिवट, चकचकीत व थोडेसे विभागलेले असते. फळ आठळीयुक्त, मोठे, गोल, करड्या व पिवळ्या रंगाचे असून त्यांत एक ते तीन विया असतात.


विविध साहित्य बनविण्यासही उपयुक्त

ताहाचे खोड खांब, वासे व फक्या बनविण्यासाठी वापरतात. काही ठिकाणी मऊ खोड पोखरून व नळीसारखे करून पाणी वाहून नेण्यासाठी वापरतात. पाने व खोडापासून मिळणाऱ्या धाग्यांचा उपयोग झाडू, कुंचले, दोर, पायपोस बनविण्यासाठी करतात. ताडगोळे शामक व पौष्टिक असतात. नीरा उत्तेजक, थंड, मूत्रल आणि जीवनसत्त्वयुक्त पेय म्हणून प्रसिध्द आहे.

यंदा वाहतूक खर्च वाढला एप्रिल महिन्यापासून ताळफळ विक्रीसाठी व्यावसायिक गावागावात आणत असतात. ताड फळाला या दिवसात चांगली मागणी असते. शहरात आलेल्या एका विक्रेत्याशी संवाद साधला असता, त्यांनी या भागात ताडफळ अद्याप उपलब्ध झाले नाही. म्हणून एटापल्ली भागातून आणल्यामुळे वाहतूक खर्च वाढला. एक नग २५ ते ३० रुपयापर्यंत विकावा लागत असल्याचे सांगितले.

- विपिन सरकार, ताड विक्रेते

 पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...
 

Web Title: Latest News demand for palm has increased in market what is price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.