Lokmat Agro >बाजारहाट > Cotton Market Update : तेलंगणा टॉपवर, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; 'सीसीआय'ची मोठी हालचाल वाचा सविस्तर

Cotton Market Update : तेलंगणा टॉपवर, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; 'सीसीआय'ची मोठी हालचाल वाचा सविस्तर

latest news Cotton Market Update: Telangana on top, Maharashtra in second place; Read CCI's big move in detail | Cotton Market Update : तेलंगणा टॉपवर, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; 'सीसीआय'ची मोठी हालचाल वाचा सविस्तर

Cotton Market Update : तेलंगणा टॉपवर, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; 'सीसीआय'ची मोठी हालचाल वाचा सविस्तर

Cotton Market Update : भारतीय कापूस महामंडळाने (CCI) यंदाच्या हंगामात विकत घेतलेल्या १०० लाख गाठींपैकी ३५ लाख गाठींची विक्री पूर्ण केली असून, उर्वरित ६५ लाख गाठींचे लिलाव सुरू आहेत.(Cotton Market Update)

Cotton Market Update : भारतीय कापूस महामंडळाने (CCI) यंदाच्या हंगामात विकत घेतलेल्या १०० लाख गाठींपैकी ३५ लाख गाठींची विक्री पूर्ण केली असून, उर्वरित ६५ लाख गाठींचे लिलाव सुरू आहेत.(Cotton Market Update)

शेअर :

Join us
Join usNext

Cotton Market Update : भारतीय कापूस महामंडळाने (CCI) यंदाच्या हंगामात विकत घेतलेल्या १०० लाख गाठींपैकी ३५ लाख गाठींची विक्री पूर्ण केली असून, उर्वरित ६५ लाख गाठींचे लिलाव सुरू आहेत. (Cotton Market Update)

देशातील कापसाचे दर हमीभावापेक्षा खाली असतानाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा जास्त असल्याचे चित्र आहे. यामुळे कापूसबाजारातील पुढील हालचालींवर साऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.(Cotton Market Update)

भारतीय कापूस महामंडळाने (Cotton Corporation of India - CCI) चालू हंगामात हमीभावाने विकत घेतलेल्या १०० लाख गाठींपैकी आतापर्यंत ३५ लाख गाठी कापसाची विक्री केली आहे. (Cotton Market Update)

उर्वरित ६५ लाख गाठी कापूस शिल्लक असून त्याचे लिलाव सुरूच आहेत, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता यांनी दिली आहे.(Cotton Market Update)

३३ टक्के कापूस सीसीआयच्या खरेदीखाली

या हंगामात देशात ३०१ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज होता. त्यापैकी सुमारे ३३% कापूस एकट्या सीसीआयने हमीभावाने खरेदी केला. हे प्रमाण खरेदी धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

राज्यानिहाय खरेदीचे चित्र

राज्यखरेदी केलेल्या गाठी
तेलंगणा४० लाख
महाराष्ट्र२९ लाख
गुजरात१४ लाख

तेलंगणामध्ये तुलनेने भाव कमी असल्यामुळे सीसीआयची सर्वाधिक खरेदी याठिकाणी झाली.

महाराष्ट्रात विकल्या १६ लाख गाठी

महाराष्ट्रात खरेदी झालेल्या २९ लाख गाठींपैकी १६ लाख गाठी सीसीआयने विकल्या असून उर्वरित साठा लिलाव प्रक्रियेत आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या लिलावामध्ये कापसाचे दर काय?

सामान्य कापूस (खंडीमागे) : ५३,५०० ते ५४,५०० रुपये

कस्तुरी गाठी : ५५,३०० च्या दरम्यान

दरात घट; उद्योजकांच्या नजरा सीसीआयवर

'सीसीआय'ने सध्या कापूस विक्रीचे दर खंडीमागे सुमारे ५०० रुपयांनी कमी केले आहेत. सध्या देशातील कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत; मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांपेक्षा हे दर अधिक असल्याचे निरीक्षण आहे.

कापूस दरातील घट पुढे किती प्रमाणात होणार? आणि सीसीआय याबाबत पुढील निर्णय कधी घेणार? याकडे उद्योजक व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : 'या' बाजारात दुपटीने वाढली पांढऱ्या सोन्याची आवक वाचा सविस्तर

Web Title: latest news Cotton Market Update: Telangana on top, Maharashtra in second place; Read CCI's big move in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.