Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Coconut Market : खोबरा बाजार तेजीत, शेतकऱ्यांना तरी दिलासा मिळतोय का? वाचा सविस्तर

Coconut Market : खोबरा बाजार तेजीत, शेतकऱ्यांना तरी दिलासा मिळतोय का? वाचा सविस्तर

latest news Coconut Market: Coconut market is booming, are farmers getting any relief? Read in detail | Coconut Market : खोबरा बाजार तेजीत, शेतकऱ्यांना तरी दिलासा मिळतोय का? वाचा सविस्तर

Coconut Market : खोबरा बाजार तेजीत, शेतकऱ्यांना तरी दिलासा मिळतोय का? वाचा सविस्तर

Coconut Market : यंदा हवामानातील बदल व पिकांच्या उत्पन्नात घट झालेल्या नारळाचे उत्पादन अर्ध्यावर आले आहे. याचा थेट परिणाम खोबऱ्याच्या दरांवर दिसून येतो आहे. केवळ एका महिन्यात खोबर्‍याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत उडी मारली आहे, तर नारळाच्या दरातही ३०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. वाचा सविस्तर (Coconut Market)

Coconut Market : यंदा हवामानातील बदल व पिकांच्या उत्पन्नात घट झालेल्या नारळाचे उत्पादन अर्ध्यावर आले आहे. याचा थेट परिणाम खोबऱ्याच्या दरांवर दिसून येतो आहे. केवळ एका महिन्यात खोबर्‍याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत उडी मारली आहे, तर नारळाच्या दरातही ३०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. वाचा सविस्तर (Coconut Market)

निलेश यमसनवार

यंदा हवामानातील बदल व पिकांच्या उत्पन्नात घट झालेल्या नारळाचे उत्पादन अर्ध्यावर आले आहे. याचा थेट परिणाम खोबऱ्याच्या दरांवर दिसून येतो आहे. केवळ एका महिन्यात खोबर्‍याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत उडी मारली आहे, तर नारळाच्या दरातही ३०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. (Coconut Market)

नारळ व खोबऱ्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली असली तरी, तांदूळ, गहू, डाळी व तेलाच्या दरात दिलासा मिळतो आहे. मात्र, खोबऱ्याच्या दरवाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत नाही.  (Coconut Market)

यावर्षी नारळाचे उत्पादन अर्ध्यावर आले असल्याने खोबऱ्याचे भाव ३०० रुपये प्रती किलोवर पोहोचले आहेत. खोबरा काळा व लाल याच्या भावात दीडपटीने वाढ झाली आहे. एक महिन्यापूर्वी २०० रुपये किलो असणारा खोबरा २६० ते ३०० रुपये किलोवर पोहोचला आहे, तर नारळामध्ये सुद्धा ३०० ते ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. (Coconut Market)

खोबऱ्याच्या दरात झपाट्याने वाढ

एका महिन्यापूर्वी २०० रुपये प्रति किलो असलेला खोबरा सध्या २६० ते ३०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. काळा व लाल खोबऱ्याच्या दरातही दीडपट वाढ झाली आहे. यामुळे खोबरा खीस, खोबऱ्याचे तेल आणि खोबऱ्यापासून बनणाऱ्या अन्य वस्तूंच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

दक्षिण भारतात खोबऱ्याचे तेल स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे तिथेही दरवाढीचा फटका ग्राहकांना बसतो आहे. प्रति किलो खोबऱ्याच्या तेलाच्या किमतीत १०० रुपयांची वाढ झाली आहे.

नारळाचे दर वाढले ५०० रुपयांनी!

याआधी १ हजार ५०० रुपये प्रती बोरी दराने विकला जाणारा नारळ सध्या २ हजार रुपयांवर पोहोचला आहे. 

तांदूळ: उत्पादन चांगले, दर स्थिर

यावर्षी तांदळाचे उत्पादन समाधानकारक झाल्याने दरात स्थैर्य आहे.

* चिन्नोर कालिमुछ : ७ हजार ५०० ते ८ हजार प्रति क्विंटल

*  जय श्रीराम कोलम : ५ हजार ५०० प्रति क्विंटल

* आर.एन.आर. : ५ हजार, 

* एचएमटी : ४ हजार ५००

* बीपीटी : ४ हजार प्रति क्विंटल

गहू  उत्पादन वाढले, दर घसरले

गेल्या वर्षी ३हजार ८०० असलेला गहू यंदा ३ हजार ते ३ हजार ३०० दरम्यान आहे.

सध्या ३ हजार ५०० चा गहू ३ हजार दराने विकला जातो आहे. 

सोयाबीन तेल: मोठी घसरण

६ महिन्यांपूर्वी २ हजार १०० असलेला सोयाबीन तेलाचा पिंप सध्या १ हजार २०० मध्ये उपलब्ध आहे.

यामुळे पामतेल व सूर्यफूल तेलाचे दरही घसरले आहेत.

डाळींचे दर खाली आले

तूर डाळ: दिवाळीमध्ये १६० रुपये होती, आता १०० ते ११० रुपये प्रति किलो आहे. 

हरभरा डाळ: ७० ते ७५

मूग डाळ: ११० ते १२०

मसूर डाळ: ८०

चना: ६५ ते ७०

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market: शासन धोरणाने 'सोयाबीन दरवाढीचे स्वप्न' मोडलं; काय आहे कारण वाचा सविस्तर

Web Title: latest news Coconut Market: Coconut market is booming, are farmers getting any relief? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.