Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Chia Seed Market : बाजारात नवे ट्रेंड; चिया-आळीवला विक्रमी बाजारभाव वाचा सविस्तर

Chia Seed Market : बाजारात नवे ट्रेंड; चिया-आळीवला विक्रमी बाजारभाव वाचा सविस्तर

latest news Chia Seed Market: New trends in the market; Chia-Aliv see record market prices, read in detail | Chia Seed Market : बाजारात नवे ट्रेंड; चिया-आळीवला विक्रमी बाजारभाव वाचा सविस्तर

Chia Seed Market : बाजारात नवे ट्रेंड; चिया-आळीवला विक्रमी बाजारभाव वाचा सविस्तर

Chia Seed Market : पारंपरिक पिकांपलीकडे जाऊन नावीन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया व आळीव खरेदीला दणक्यात सुरुवात झाली असून, चियाला प्रतिक्विंटल २२ हजार रुपये तर आळीवला ७ हजार ५०० रुपयांचा दर मिळाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

Chia Seed Market : पारंपरिक पिकांपलीकडे जाऊन नावीन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया व आळीव खरेदीला दणक्यात सुरुवात झाली असून, चियाला प्रतिक्विंटल २२ हजार रुपये तर आळीवला ७ हजार ५०० रुपयांचा दर मिळाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

Chia Seed Market : पारंपरिक पिकांना मिळणाऱ्या मर्यादित दरांच्या पार्श्वभूमीवर नावीन्यपूर्ण व पौष्टिक पिके शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. (Chia Seed Market)

वर्षाच्या अखेरच्या दिवशी, ३१ डिसेंबर रोजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील चिया व आळीव खरेदीला दणक्यात सुरुवात झाली. (Chia Seed Market)

यावेळी चियाला प्रतिक्विंटल २२ हजार रुपयांचा विक्रमी दर, तर आळीवला ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.(Chia Seed Market)

यंदाच्या हंगामातील नवीन चियाची पहिली खरेदी बाजार समितीत प्रतिक्विंटल १७ हजार ते २२ हजार रुपये या दराने झाली. पहिल्याच दिवशी सुमारे २२० क्विंटल चियाची आवक झाली असून, आगामी काळात आवक वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. (Chia Seed Market)

चियाला मिळालेला हा दर समाधानकारक असून, पोषणमूल्ये आणि औषधी गुणधर्मांमुळे या पिकाला बाजारात वाढती मागणी आहे.(Chia Seed Market)

दरम्यान, आळीव (हलीम/गार्डन क्रेस) या पिकाच्या खरेदीलाही बाजार समितीत दमदार प्रारंभ झाला आहे. चिवरा येथील शेतकरी रामप्रसाद क्षीरसागर यांनी उत्पादित केलेल्या आळीवला प्रतिक्विंटल ७ हजार ५०० रुपये इतका दर मिळाला. (Chia Seed Market)

नवीन वाणाला मिळालेला हा दर पाहता पुढील काळात आळीव लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.(Chia Seed Market)

शेतकरी व आडत्यांचा सत्कार

चिया व आळीव खरेदीच्या शुभारंभानिमित्त बाजार समितीच्या वतीने संबंधित शेतकरी व आडत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती महादेवराव काकडे, संचालक राजू चौधरी, हिराबाई जानीवाले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोयर, व्यापारी प्रतिनिधी, आडते, बाजार समितीचे कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा निर्धार

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा, यासाठी बाजार समिती कटिबद्ध आहे. नवीन चिया व आळीवला मिळालेला दर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असून, पुढील काळातही पारदर्शक व्यवहार ठेवण्यावर भर दिला जाईल. - महादेवराव काकडे, सभापती

नावीन्यपूर्ण पिकांकडे वाढता कल

चिया आणि आळीवसारखी पौष्टिक, कमी खर्चाची व चांगला बाजारभाव देणारी पिके भविष्यात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणारी ठरू शकतात. वाशिम बाजार समितीत मिळालेल्या विक्रमी दरामुळे परिसरातील शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण पिके स्वीकारण्यास नवी दिशा मिळाली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Shetmal Vahatuk : शेतमालाचा सुवर्णयोग; बटाट्यांनी दिला मध्य रेल्वेला 'जॅकपॉट' वाचा सविस्तर

Web Title : चिया, आळीव के बीजों की रिकॉर्ड कीमत, बाजार में नए रुझान

Web Summary : वाशिम बाजार में चिया और आळीव के बीजों को रिकॉर्ड कीमत मिली। चिया ₹22,000/क्विंटल, आळीव ₹7,500/क्विंटल पर पहुंचा। किसान दरों से खुश हैं, जिससे नवीन फसलों में रुचि बढ़ रही है। बाजार उचित मूल्य के लिए प्रतिबद्ध है।

Web Title : Chia, Aliv Seeds Fetch Record Prices, New Trends in Market

Web Summary : Chia and Aliv seeds are fetching record prices in Washim market. Chia reached ₹22,000/quintal, Aliv ₹7,500/quintal. Farmers are happy with rates, prompting interest in innovative crops. Market committed to fair pricing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.