Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Chia Seed Market : चिया ठरतोय फायदेशीर; घसरणीनंतर दराची जोरदार कमबॅक!

Chia Seed Market : चिया ठरतोय फायदेशीर; घसरणीनंतर दराची जोरदार कमबॅक!

latest news Chia Seed Market: Chia is becoming profitable; Price makes a strong comeback after the decline! | Chia Seed Market : चिया ठरतोय फायदेशीर; घसरणीनंतर दराची जोरदार कमबॅक!

Chia Seed Market : चिया ठरतोय फायदेशीर; घसरणीनंतर दराची जोरदार कमबॅक!

Chia Seed Market : गेल्या काही दिवसांपासून घसरलेल्या चियाच्या दरात आता सुधारणा होत असून, अवघ्या आठवड्यातच दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चिया उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.(Chia Seed Market)

Chia Seed Market : गेल्या काही दिवसांपासून घसरलेल्या चियाच्या दरात आता सुधारणा होत असून, अवघ्या आठवड्यातच दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चिया उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.(Chia Seed Market)

वाशिम : नावीन्यपूर्ण पीक म्हणून ओळख मिळवत असलेल्या चिया पिकाला बाजारात चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.(Chia Seed Market)

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी चियाला प्रतिक्विंटल १५,४०० ते १७,६५० रुपये असा दर मिळाल्याने चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.(Chia Seed Market)

गेल्या आठवड्यातील तुलनेत दरात सुमारे दोन हजार रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Chia Seed Market)

आठवडाभरात दरात मोठी वाढ

हंगामाच्या सुरुवातीला चियाच्या दरात घसरण होऊन भाव १३ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले होते. मात्र, मागील आठवड्यातून दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली.

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत गत बुधवारी चियाला १३,२५० ते १५,६०० रुपये दर मिळाला होता. त्यानंतर अवघ्या आठवड्यात दरात झपाट्याने वाढ होऊन वाशिम बाजारात कमाल दर १७,६५० रुपयेपर्यंत पोहोचला आहे.

जिल्ह्यात वाढले चियाचे क्षेत्र

यंदा वाशिम जिल्ह्यात सुमारे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्रावर चियाची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण पीक म्हणून घेतलेला हा प्रयोग यशस्वी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामान साथ देत असल्याने उत्पादनही समाधानकारक झाले आहे.

बाजारात आवक वाढली

दरात वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पुढाकार घेतल्याने बाजारातील आवकेतही वाढ झाली आहे.

गत आठवडा : सुमारे ३,१५० क्विंटल आवक

सोमवारी (२० एप्रिल) : सुमारे ३,३०० क्विंटल आवक

दरातील सुधारणा पाहता पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा

चियाच्या दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मागील घसरणीमुळे चिंतेत असलेल्या उत्पादकांना सध्या दिलासा मिळाला आहे.

दर स्थिर राहिले किंवा आणखी वाढले तर चिया हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय ठरू शकते.

बाजारातील मागणी वाढ, मर्यादित उपलब्धता आणि चियाचे वाढते पोषणमूल्य यामुळे या पिकाला चांगला दर मिळत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

चियाच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे. पुढील काळातही दर टिकून राहिल्यास चिया हे पीक पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Dhanya Bajarbhav : आखाती युद्धाचा थेट परिणाम; सोयाबीन-तूर तेजीत, गव्हातही सुधारणा वाचा सविस्तर
 

अधिक वाचा : Gahu Bajarbhav : अक्षय तृतीयेपूर्वी गहू तेजीत; कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

Web Title: latest news Chia Seed Market: Chia is becoming profitable; Price makes a strong comeback after the decline!