Lokmat Agro >बाजारहाट > केळीचा बोर्ड भाव 1600 रुपये प्रति क्विंटल, शेतकऱ्यांच्या पदरात मात्र 300 ते 500 रुपयेच

केळीचा बोर्ड भाव 1600 रुपये प्रति क्विंटल, शेतकऱ्यांच्या पदरात मात्र 300 ते 500 रुपयेच

Latest News board price of banana is 1600 rupees per quintal, farmers get 300 to 500 rupees | केळीचा बोर्ड भाव 1600 रुपये प्रति क्विंटल, शेतकऱ्यांच्या पदरात मात्र 300 ते 500 रुपयेच

केळीचा बोर्ड भाव 1600 रुपये प्रति क्विंटल, शेतकऱ्यांच्या पदरात मात्र 300 ते 500 रुपयेच

Keli Market : केवळ टॅरिफचे कारण पुढे करून व मागणी नसल्याचे कारण देत हे दर पाडले जात आहेत.

Keli Market : केवळ टॅरिफचे कारण पुढे करून व मागणी नसल्याचे कारण देत हे दर पाडले जात आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव : जून महिन्यात १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटलने विकली जाणारी जिल्ह्यातील केळी  (Banana Market) आता कवडीमोल भावाने विक्री करण्याची वेळ केळी उत्पादकांवर आली आहे. गेल्या १५ दिवसात केळीच्या दरात मोठी घसरण झाली असून, अनेक ठिकाणी व्यापारी फक्त ३०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल दराने केळी खरेदी करत आहेत. 

अनेक व्यापारी या घसरणीसाठी अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफचे (America Tariff) कारण देत आहेत. मात्र, प्रत्यक्षात जळगावमधून निर्यात होणारी केळी अरब राष्ट्रांमध्ये जातात. त्यामुळे या टॅरिफचा कोणताही संबंध नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. केवळ टॅरिफचे कारण पुढे करून व मागणी नसल्याचे कारण देत हे दर पाडले जात आहेत.

बोर्ड भाव १६०० रूपये प्रति क्विंटल, तरीही शेतकऱ्यांना मिळतोय केवळ ३००-५०० रुपये भाव
केळीचा बोर्ड भाव १६०० रुपये प्रति क्विंटल असताना, शेतकऱ्यांच्या पदरात मात्र फक्त ३०० ते ५०० रुपयेच पडत आहेत. गणेशोत्सवामुळे बाजारात केळीला चांगली मागणी आहे. सध्या केळी ५० रुपये डझनने विकली जात आहेत. असे असतानाही, व्यापारी 'मागणी नाही' असे कारण देत शेतकऱ्यांकडून कमी दरात माल खरेदी करत आहेत.

महिनानिहाय केळीचे दर 

  • जून : १८०० ते २२०० रुपये 
  • जुलै : २२०० ते २३०० रुपये 
  • ऑगस्ट : १३०० ते १५०० रुपये 
  • सप्टेंबर : ३०० ते ५०० रुपये 

 

केळीचे दर व्यापाऱ्यांकडून पाडले जात आहेत. बोर्ड भाव केवळ नावालाच असून, प्रत्यक्षात दर ३०० ते ५०० रुपयांपर्यतच मिळत आहे. केळीचा माल चांगला असो वा खराब, तरीही व्यापाऱ्यांकडून चांगला भाव दिला जात नाही.
- डॉ. सत्वशील जाधव, केळी उत्पादक शेतकरी

Web Title: Latest News board price of banana is 1600 rupees per quintal, farmers get 300 to 500 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.