Lokmat Agro >बाजारहाट > Apple Market : बाजार समितीमध्ये देशी सफरचंदाची वाढली गोडी वाचा सविस्तर

Apple Market : बाजार समितीमध्ये देशी सफरचंदाची वाढली गोडी वाचा सविस्तर

latest news Apple Market: Read in detail the increased sweetness of local apples in the market committee | Apple Market : बाजार समितीमध्ये देशी सफरचंदाची वाढली गोडी वाचा सविस्तर

Apple Market : बाजार समितीमध्ये देशी सफरचंदाची वाढली गोडी वाचा सविस्तर

Apple Market : छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिमाचलहून आलेल्या गोड, ताज्या सफरचंदांची आवक वाढताना दिसत आहे. (Apple Market)

Apple Market : छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिमाचलहून आलेल्या गोड, ताज्या सफरचंदांची आवक वाढताना दिसत आहे. (Apple Market)

शेअर :

Join us
Join usNext

Apple Market :  छत्रपती संभाजीनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिमाचलहून आलेल्या गोड, ताज्या सफरचंदांची आवक वाढताना दिसत आहे. बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. (Apple Market)

महिन्यांपासून बाजारात महागात विकले जाणारे विदेशी सफरचंदाचे दर आता गडगडले आहेत. कारण हिमाचल प्रदेशातून आलेल्या स्वस्त, ताज्या आणि चवदार सफरचंदांनी बाजारात धडक मारली आहे.आवक मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. (Apple Market)

विदेशी सफरचंदांचे नाव ऐकलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर चकचकीत लालसर रंग, परदेशी ब्रँड आणि खिशाला जबरदस्त फटका अशीच काहीशी प्रतिमा उभी राहते.  (Apple Market)

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बाजारात विकल्या जाणाऱ्या या महागड्या आणि कमी चवदार सफरचंदांनी ग्राहकांचा वैताग आणला आहे. पण आता त्या विदेशी सफरचंदांना हिमाचल प्रदेशातून आलेल्या गोड आणि स्वस्त सफरचंदांनी जबरदस्त टक्कर दिली आहे.

फक्त १०० रुपयांत किलोभर अस्सल हिमाचली सफरचंद!

छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत हिमाचल प्रदेशातून नव्या हंगामातील सफरचंदांची आवक सुरू झाली आहे. सुरुवातीला १२० ते १५० रुपये किलो दराने विकली जाणारी ही सफरचंदं आता फक्त १०० रुपये किलोच्या दरात उपलब्ध आहेत. गणेशोत्सवाच्या काळात हा दर आणखी कमी होऊन ७० ते १०० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.  (Apple Market)

देशात टर्की, इराण, अमेरिका, चिली, न्यूझीलंड, इटली या देशांतून सफरचंदांची आवक होते. यात टर्कींहून सर्वाधिक सफरचंद आयात होतात. विदेशी सफरचंदाला २५० ते ३२० रुपये किलोपर्यंत भाव मिळाले; पण आता हिमाचल प्रदेशातील सफरचंद बाजारात आले असून, त्याचे दर १०० ते १५० रुपये किलोदरम्यान आहेत. त्यामुळे सफरचंदांची विक्री वाढली आहे. विदेशी सफरचंद खरेदी करणारे कमी झाले आहेत.- माजिद शेख, व्यापारी

हिमाचल आणि काश्मीर; देशातील प्रमुख सफरचंद उत्पादक राज्ये

हिमाचल प्रदेशात सफरचंदाचा मुख्य हंगाम ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान असतो.

काश्मीरमध्ये देशातील ६० टक्के सफरचंद उत्पादन याच भागातून होते.येथील हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत चालतो.

सध्या हिमाचलमधून दररोज २ ते ३ ट्रक सफरचंदांची आवक शहरात होत असून, १५ ऑगस्टनंतर आवक वाढणार आहे.

विदेशी सफरचंदांची आवक

भारतामध्ये टर्की, इराण, अमेरिका, चिली, न्यूझीलंड, इटली यांसारख्या देशांतून सफरचंदांची मोठ्या प्रमाणावर आयात होते.विदेशी सफरचंदांना २५० ते ३२० रुपये प्रति किलो दर मिळत असला तरी, सामान्य ग्राहकांसाठी हे दर परवडणारे नाहीत. त्यात चव आणि ताजेपणाच्या बाबतीत हे सफरचंद फारसे समाधान देत नसल्याने ग्राहकांनी स्थानिक सफरचंदांकडे मोर्चा वळवला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Chia Market : चियाच्या दरात झपाट्याने बदल; घसरणीनंतर पुन्हा सुधारणा!

Web Title: latest news Apple Market: Read in detail the increased sweetness of local apples in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.