Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Agri Market Export : आखाती तणावाचा फटका; हळद-केळी निर्यात थांबली का? वाचा सविस्तर

Agri Market Export : आखाती तणावाचा फटका; हळद-केळी निर्यात थांबली का? वाचा सविस्तर

latest news Agri Market Export: Gulf tensions hit; Have turmeric-banana exports stopped? Read in detail | Agri Market Export : आखाती तणावाचा फटका; हळद-केळी निर्यात थांबली का? वाचा सविस्तर

Agri Market Export : आखाती तणावाचा फटका; हळद-केळी निर्यात थांबली का? वाचा सविस्तर

Agri Market Export : आखाती देशांतील वाढत्या तणावाचा परिणाम आता स्थानिक कृषी बाजारपेठांवरही दिसू लागला आहे. हिंगोली बाजार समितीत हळदीच्या दरात घसरण झाली असून खामगाव परिसरात केळीचे दर जवळपास निम्म्यावर आले आहेत. निर्यात मंदावल्याचे कारण पुढे केले जात असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.(Agri Market Export)

Agri Market Export : आखाती देशांतील वाढत्या तणावाचा परिणाम आता स्थानिक कृषी बाजारपेठांवरही दिसू लागला आहे. हिंगोली बाजार समितीत हळदीच्या दरात घसरण झाली असून खामगाव परिसरात केळीचे दर जवळपास निम्म्यावर आले आहेत. निर्यात मंदावल्याचे कारण पुढे केले जात असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.(Agri Market Export)

Agri Market Export : जागतिक पातळीवरील घडामोडींचा परिणाम आता स्थानिक कृषी बाजारपेठांवरही दिसू लागला आहे.(Agri Market Export)

आखाती देशांतील वाढत्या तणावामुळे निर्यात मंदावण्याची भीती निर्माण झाली असून त्याचा थेट फटका हळद आणि केळीच्या बाजारभावांवर बसत आहे.(Agri Market Export)

मराठवाडा व विदर्भातील हळद व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या हिंगोली बाजार समितीत हळदीचे दर घसरले आहेत, तर खामगाव परिसरात केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. परिणामी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.(Agri Market Export)

हिंगोली बाजारात हळदीची आवक सुरू

हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. दरवर्षी हंगामात येथे ५ ते ७ हजार क्विंटल हळदीची आवक होत असते. सध्या हंगामाची सुरुवात असल्याने दररोज एक ते दीड हजार क्विंटल हळद विक्रीसाठी येत आहे. बाजारात नवीन हळदीसोबत काही प्रमाणात जुनी हळदही दाखल होत आहे.

मात्र सध्या हळदीला सरासरी १३,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून तो मागील वर्षाच्या तुलनेत कमी असल्याचे व्यापारी व शेतकरी सांगतात. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांना असल्याने खरेदी करताना सावध भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे भाववाढीवर अनिश्चिततेचे सावट असल्याचे चित्र आहे.

केळीच्या दरात निम्म्याने घसरण

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पोरज परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांना दरघटीचा मोठा फटका बसत आहे. ज्ञानगंगा नदी परिसरात पाण्याची उपलब्धता चांगली असल्यामुळे पोरज, वरणा, निमकवळा, तांदुळवाडी, काळेगाव आदी भागांत मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. मात्र सध्या केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी २१०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाणारी केळी सध्या केवळ १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जात आहे. व्यापाऱ्यांकडून आखाती देशांतील तणावामुळे फळांची निर्यात मंदावल्याचे कारण सांगितले जात आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारातील मागणी व दरांवर झाल्याचे सांगितले जात आहे.

रमजान महिन्यातही दर कमी

या भागात केळीबरोबरच टरबूज, खरबूज आणि आंबा यांसारख्या फळपिकांचीही मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सामान्यतः रमजान महिन्यात या फळांना चांगली मागणी असते; मात्र यंदा मागणी असूनही दरात ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे शेतकरी सांगतात.

उत्पादन खर्चही निघेना

दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या मते, इतर राज्यांमध्ये किंवा काही बाजारांमध्ये या मालाला तुलनेने चांगले दर मिळत असले तरी स्थानिक बाजारात मात्र कमी दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

केळी व्यापारी युसूफ खान यांच्या मते, इस्रायल-इराण तणावामुळे काही आखाती बाजारपेठांकडे जाणाऱ्या फळांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असली तरी पुढील काही दिवसांत परिस्थिती सुधारल्यास दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले

केळी उत्पादक कोमलसिंग बोराडे यांनी सांगितले की, केळी पिकावर मोठा खर्च करूनही बाजारात योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. चांगला माल खराब होऊ नये म्हणून कमी दरात व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

तर गोवर्धन पाटील या शेतकऱ्यांनी सांगितले की, टरबूज पिकातून साधारण एकरी २० टन उत्पादन अपेक्षित असते; मात्र यंदा उत्पादन १२ ते १५ टनांपर्यंतच झाले. त्यातही निर्यात मंदावल्याचे कारण सांगून व्यापारी कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

संग्रामपूर व जळगाव जामोद भागातही चिंता

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील काही भागातही मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते. सध्या दर घसरल्यामुळे या भागातील शेतकरीही चिंतेत असून बाजारभाव सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निर्यात मंदावण्याची मुख्य कारणे

* आखाती देशांतील तणाव / युद्धजन्य परिस्थिती

*शिपिंग आणि लॉजिस्टिक्स अडचणी

*आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी कमी

*जास्त उत्पादन आणि स्थानिक आवक वाढ

*चलन व व्यापार व्यवहारातील अडथळे

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : सोन्यासारख्या हळदीला भाव नाही; युद्धामुळे बाजारात मंदी

अधिक वाचा : Tur Kharedi : तूर खरेदीचा वेग वाढणार का? दीड महिन्यात साडेतीन टक्केच खरेदी

Web Title : खाड़ी तनाव से कृषि निर्यात प्रभावित: हल्दी, केले का निर्यात रुका?

Web Summary : खाड़ी तनाव का हिंगोली और खामगाँव में हल्दी और केले की कीमतों पर असर। निर्यात धीमा, किसानों को नुकसान, कीमतें गिरीं, वित्तीय योजना प्रभावित। व्यापारियों के अनुसार निर्यात धीमा होने से मांग प्रभावित।

Web Title : Gulf tension hits agri exports: Turmeric, banana exports halted?

Web Summary : Gulf tensions impact turmeric and banana prices in Hingoli and Khamgaon. Exports slow, farmers face losses as prices drop significantly, affecting financial planning. Traders cite export slowdown affecting demand.