Join us

Lasun Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत कांदा व लसणाची चांगली आवक; कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:43 IST

गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबमधून मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने लसणाचे दर निम्म्याहून अधिक घटले आहेत.

सोलापूर : गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबमधून मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने लसणाचे दर निम्म्याहून अधिक घटले आहेत. मागील काही महिन्यांपासून ४५० रूपये पार झालेले लसणाचे दर आता कमी झाले आहेत.

आता नवीन लसूण बाजारात आल्यामुळे बाजारात प्रति किलो १५० ते १८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. मागील काही महिन्यांत लसूण महाग झाल्याने दररोजच्या भाजीतील चव गायब झाली होती.

आता लसूण स्वस्त झाल्यामुळे स्वयंपाकघरात पुन्हा फोडणीचा ठसका वाढू लागला आहे. पूर्वी चांगल्या प्रतीचा लसूण ४०० रुपयांनी विक्री होत होता.

तो आता २०० रुपयांवर उतरला असून पुढील काळात आणखीन नवीन लसूण दाखल होताच दर आणखी कमी होतील, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. 

कांदा आला आवाक्यात सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २८४०० क्विंटल आवक झाली त्यास किमान आणि कमाल दर ३००० ते ३५०० होता. तर सरासरी दर २१०० रूपये दर मिळाला. कांद्याचे दरही नियंत्रणात आले आहेत.

अशी आहे लसणाची आवक व दरसोमवारी ९५ क्विंटल लसणाची आवक झाली. किमान अन् कमाल दर १०५०० ते २१००० तर सरासरी दर १८८०० रूपये दर मिळाला. २८ जानेवारी मंगळवारी १३५ क्विंटल लसणाची आवक झाली. किमान अन् कमाल दर ८३०० ते १६००० तर सरासरी १२००० रूपये दर मिळाला. 

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसोलापूरगुजरातराजस्थानमध्य प्रदेशपंजाब