Join us

Lasun Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत १०० क्विंटल लसणाची आवक; कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 17:45 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज सरासरी १०० क्विंटलची आवक होत असून, मागणी त्यापेक्षा अधिक आहे.

कोल्हापूर : लसणाची आवक कमी झाल्याने सगळीकडेच दर वाढले आहेत. किरकोळ बाजारात लसूण ४०० रुपये किलोपर्यंत गेल्याने वरणातून तो गायब झाला आहे.

कोल्हापूरशेती उत्पन्न बाजार समितीत रोज सरासरी १०० क्विंटलची आवक होत असून, मागणी त्यापेक्षा अधिक आहे. त्यात तामिळनाडू, गोवा आणि कोकणातूनही मागणी वाढल्याने लसणाचे दर कडाडले आहेत.

लसणाचा वापर रोजच्या जेवणात करावा लागतो. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून लसणाने चांगलीच उसळी घेतली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या आमटीतून लसूण गायब झाला आहे.

सध्याची बाजारातील आवक व मागणी यांमध्ये मोठी तफावत असल्याने दरवाढ झाल्याची व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.साधारणतः डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात नवीन लसणाची आवक होते.

मात्र यंदा ही आवक थोडी लांबण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन लसणाची आवक सुरू होऊन त्यानंतर दर आवाक्यात येण्यास सुरुवात होईल.

लसूण-अद्रक पेस्टचावापर वाढला लग्न समारंभासह मोठ्या जेवणावेळी लसूण-अद्रक पेस्टचा वापर व्हायचा. आता नियमित जेवणातही या पेस्टचा वापर वाढला. त्याचा परिणामही लसणाच्या मागणीवर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

लसणाची पाकळी ड्रायफ्रूटला भारी• लसूण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, विशेषतः पुरुषांसाठी.• लसूण रक्तदाब व कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते, हृदयविकाराचा धोका कमी करते.• लसूण रक्तप्रवाहदेखील सुधारतो, संपूर्ण हृदयाचे कार्य वाढवितो.• या प्रभावाचे श्रेय एलिसिनसारख्या संयुगाला दिले जाते, जे कच्च्या लसणात अधिक शक्तिशाली असते.• त्यामुळे लसणाची पाकळी आरोग्यासाठी ड्रायफ्रूटला भारी, असे मानले जाते.

बाजार समितीतील आवक व दर प्रतिक्विंटलआवक : १६० पिशव्याकमीत कमी दर : १५०जास्तीत जास्त दर : ३८०

आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे लसणाचे दर वाढले आहेत. अजून महिनाभर ही तेजी राहू शकते. नवीन लसूण बाजारात आल्यानंतर दर स्थिर होतील. - उदय देसाई (व्यापारी)

टॅग्स :बाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकोल्हापूरमार्केट यार्डशेतकरीशेतीतामिळनाडूगोवाकोकण