Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > रूढी परंपरेच्या फेऱ्यात कोहळाची चलती; राज्याच्या विविध बाजारात कोहळा खातो भाव

रूढी परंपरेच्या फेऱ्यात कोहळाची चलती; राज्याच्या विविध बाजारात कोहळा खातो भाव

Kohla's movement in the round of tradition; Kohla eats up prices in various markets of the state | रूढी परंपरेच्या फेऱ्यात कोहळाची चलती; राज्याच्या विविध बाजारात कोहळा खातो भाव

रूढी परंपरेच्या फेऱ्यात कोहळाची चलती; राज्याच्या विविध बाजारात कोहळा खातो भाव

'आवळा देऊन कोहळा काढला', अशी म्हण प्रचलित असली तरी हा कोहळा अमावास्या येताच बाजारात चांगलाच भाव खातो. घरात आणि व्यवसायात मुख्य दरवाजावर कोहळा बांधल्यास येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोषांपासून संरक्षण होते, अशी धारणा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

'आवळा देऊन कोहळा काढला', अशी म्हण प्रचलित असली तरी हा कोहळा अमावास्या येताच बाजारात चांगलाच भाव खातो. घरात आणि व्यवसायात मुख्य दरवाजावर कोहळा बांधल्यास येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोषांपासून संरक्षण होते, अशी धारणा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.

त्यामुळे शनिवार, अमावास्या किंवा पौर्णिमा येताच बाजारात कोहळे विक्रीसाठी येतात अन् भाव खाऊन जातात.

कोहळा मुख्य दरवाजावर, लाल वस्त्रात गुंडाळून आणि तीन गाठी मारून शनिवारी, अमावास्येला किंवा पौर्णिमेला सूर्यास्तानंतर बांधला जातो. घरात आणि व्यवसायाच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करतो, असे मानले जाते.

२० ऑक्टोबरपासून २१ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी अमावास्या कालावधी असल्याने सोमवारी बीड येथील बाजारात कोहळ्यांची मोठी आवक झाली. आकारानुसार, १०० ते १५० रुपयांना कोहळे विकले जात होते. ग्राहकही ते खरेदी करत होते.

राज्याच्या विविध बाजारातील कोहळा आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/10/2025
पुणेलोकलक्विंटल269150040002750
नागपूरलोकलक्विंटल140150020001875
कामठीलोकलक्विंटल1151020101760
हिंगणालोकलक्विंटल2200025002166
19/10/2025
रामटेक---क्विंटल18001000900
पुणेलोकलक्विंटल43880035002150
नागपूरलोकलक्विंटल120100020001875
कामठीलोकलक्विंटल3152020201770

हेही वाचा : एमपीएससी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट; दोन एकर अद्रक शेतीतून कमावले १५ लाख

Web Title: Kohla's movement in the round of tradition; Kohla eats up prices in various markets of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.