नवी मुंबई : वटपौर्णिमेमुळे फणसाला मागणी वाढली आहे. कर्नाटक व तामिळनाडूमधून सोमवारी २२० टन आवक झाली.
होलसेल मार्केटमध्ये २० ते २८ व किरकोळ मार्केटमध्ये ६० रुपये किलो दराने फणसाची विक्री होत आहे. देशात सर्वाधिक फणसाचे उत्पादन केरळ, कर्नाटक व तामिळनाडू या तीन राज्यांमध्ये होते.
मुंबईमध्येही या तीन राज्यांमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असते. सद्यस्थितीमध्ये केरळमधील आवक कमी झाली असून, कर्नाटक व तामिळनाडूतील आतक वाढली आहे.
मुंबई, नवी मुंबईमध्ये वटपौर्णिमेच्या पूजेसाठी फणसाला मागणी असते. बाजार समितीमध्ये २२० टन आवक होऊनही त्याची तत्काळ विक्री झाली आहे.
फणस फ्लेव्हरचे आईसक्रीम
कोकणामध्ये फणसाचे उत्पादन होत असले तरी मागणीच्या तुलनेमध्ये उत्पादन कमी असते. यामुळे दक्षिणेकडील राज्यांमधून फणस मागविला जातो. हंगाम सुरू झाल्यापासून मार्केटमध्ये फणसाच्या फ्लेव्हरचे आईस्क्रीमही उपलब्ध होऊ लागले आहे.
येथे सर्वाधिक उत्पादन
केरळने फणसाला राज्य फळाचा दर्जा दिला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये फणसाचे उत्पादन होते. कर्नाटकमधील तुमाकुर, चिक्कबल्लापूर, रामनगरा, बंगळुरू परिसरात फणसाचे उत्पादन होते. तामिळनाडूमध्ये कुड्डालोर व इतर जिल्ह्यांमध्ये फणसाचे उत्पादन होते.
अधिक वाचा: आता शेतजमिनीचे वाद मिटणार, महसूल विभाग सुरु करतोय हा नवीन उपक्रम; वाचा सविस्तर