Kapus Kharedi : बुलढाणा जिल्ह्यात भारतीय कापूस निगम (सीसीआय) अंतर्गत २०२४-२५ हंगामात आतापर्यंत ४,५०,०३४.२५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
तसेच, शासकीय खरेदी केंद्रांमध्ये २,७२,७२६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावाचा लाभ घेण्यासाठी आज (१५ मार्च) पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे.(Kapus Kharedi)
२०२४-२५ हंगाम ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झाला असून, किमान आधारभूत किंमतीवर (एमएसपी) कापूस विक्रीसाठी नोंदणी आवश्यक आहे. (Kapus Kharedi)
बाजारात कापसाचे दर घसरत असल्याने, शेतकऱ्यांना हमीभावाने खरेदी करणाऱ्या शासकीय केंद्रांचा मोठा आधार मिळत आहे. खासगी व्यापारी अपेक्षेपेक्षा कमी दर देत असल्यामुळे, सीसीआयच्या शासकीय खरेदी केंद्रांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. (Kapus Kharedi)
सध्या बाजारात खासगी व्यापारी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी करत आहेत. मात्र, सीसीआय खरेदी केंद्रांवर ७,४२१ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. या दरातील फरकामुळे शेतकऱ्यांची शासकीय खरेदी केंद्रांकडे कल वाढला आहे. (Kapus Kharedi)
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
७/१२ आणि ८ अ उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत, अन्य आवश्यक दस्तऐवज
१५ मार्चपूर्वी नोंदणी करणे अनिवार्य!
शेतकऱ्यांनी कापूस किमान आधारभूत किमतीच्या दरात विक्रीसाठी १५ मार्चपूर्वी नोंदणी करणे गरजेचे आहे. नियमानुसार नोंदणी न केल्यास शासकीय हमीभावाचा लाभ मिळणार नाही. कापूस विक्री करताना आर्द्रता आणि दर्जा निकष पाळणे आवश्यक आहे. (Kapus Kharedi)
जिल्ह्यातील खरेदीचा आजवरचा आढा
केंद्र | खरेदी (क्विंटल) | शेतकरी |
दे. राजा | १,२४,६३६ | ८,५०० |
खामगाव | १,२२,९९९.०५ | १०,८२४ |
चिखली | ६९,४३४.३० | २३,३४७ |
मलकापूर | ६०,६१४.५० | २,३३४ |
नांदुरा | ३७,६७६.८० | ११,१९४ |
शेगाव | २९,९४८.५० | १,२४४ |
ज. जामोद | १३,३४६.०० | ४,७६६ |
किमान आधारभूत किमतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करणे गरजेचे आहे. कापूस विक्री करताना दर्जा आणि आर्द्रता निकष पाळावेत, नोंदणी ऑनलाइन किंवा खरेदी केंद्रांवर जाऊन शेतकऱ्यांना करता येईल. - नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, बुलढाणा